शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रिपाइंची विदर्भ राज्य परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 22:36 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)तर्फे येत्या रविवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाईन्स येथे विदर्भ राज्य परिषद आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरामदास आठवले उद्घाटकविदर्भवादी नेत्यांची प्रमुख उपस्थिती

आॅनलाईन लोकमतनागपूर : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)तर्फे येत्या रविवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाईन्स येथे विदर्भ राज्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन रिपाइं (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येईल.रिपाइं (ए)चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या  या परिषदेत विदर्भ विकास परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. श्रीहरी अणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे नेते माजी मंत्री नितीन राऊत, आ. रवी राणा, आ. अनिल बोंडे, आ. आशिष देशमुख, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, आदिम नेत्या अ‍ॅड. नंदा पराते, विदर्भ माझाचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे हे विदर्भवादी नेते प्रमुख मार्गदर्शक राहतील. यासोबतच अहमद कादर, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील, अनिल गोंडाणे, भीमराव बन्सोड, एल.के. मडावी प्रामुख्याने उपस्थित राहतील.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी पत्रपरिषदेत याबाबत माहिती दिली. या परिषदेत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव मंजूर केला जाईल. या ठरावासंबंधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले चर्चा करतील. भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव याच कार्यकाळात मंजूर करावा, अशी आमची आग्रही मागणी राहील, असेही त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेला भीमराव बन्सोड, आर.एस. वानखेडे, राजन वाघमारे, बाळू घरडे, भीमराव मेश्राम, डॉ. मनोज मेश्राम, हरीश जानोरकर, विनोद थूल, हरीश लांजेवार, नंदू गावंडे, सौरभ थुलकर आदी उपस्थित होते.विधानभवनावर मोर्चायेत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी रिपाइं (ए)तर्फे विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल. याबाबतही परिषदेत चर्चा केली जाईल. तसेच जानेवारीमध्ये विदर्भ यात्रा काढण्यात येणार असल्याचे थुलकर यांनी सांगितले.