शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ साहित्य संघ माझ्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 11:41 IST

विदर्भ साहित्य संघ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी मदत करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात संमेलनाध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. किशोर सानप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देकिशोर सानप यांची पत्रपरिषदमांडला प्रचार यात्रेचा लेखाजोखा

आॅनलाईन लोकमतनागपूर : विदर्भातीलच दोन उमेदवार एकमेकांसमोर आव्हान उभे करीत असताना विदर्भ साहित्य संघ कुणाच्या डोक्यावर आपला हात ठेवेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. पण, मी निश्चिंत आहे. कारण, याच विदर्भ साहित्य संघाने मला याआधी नरखेडचे जनसाहित्य संमेलन व गोंदियात झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन गौरविले आहे आणि आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी मदत करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात संमेलनाध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. किशोर सानप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गुरुवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आतापर्यंत झालेल्या प्रचार यात्रेचा लेखाजोखा मांडताना डॉ. सानप म्हणाले, आतापर्यंत पाच हजार किमीचा प्रवास पूर्ण झाला आहे. उद्यापासून मी पुन्हा दौऱ्यावर निघतो आहे. मतदारांचा प्रतिसाद सकारात्मक आहे. वाद मला आवडत नाहीत.सुसंवादावर माझा भर राहणार आहे. कुठल्याही प्रतिभेला नैतिकतेचा आधार असायला हवा, या विचारांचा मी आहे. या निवडणुकीतील इतर उमेदवार माझे प्रतिस्पर्धी असले तरी सर्व चारित्र्यवान व प्रतिभावंत आहेत. त्यांच्या वाङ्मयीन योगदानाचा मी सन्मान करतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.गोव्यातील साहित्य- सांस्कृतिक क्षेत्रातील प्रख्यात कवी विष्णू सूर्या वाघ यांच्य कवितासंग्रहावर गुन्हा दाखल झालाय. मुस्कटदाबीच्या या अजब प्रयोगाविषयीही डॉ. सानप यांनी यावेळी निषेध व्यक्त केला.शोभणे माझा लहान भाऊडॉ. रवींद्र शोभणे माझे प्रतिस्पर्धी असले तरी मी त्यांना माझा लहान भाऊच मानतो. त्यांच्या पुस्तकांवर मी लिहिले आहे. त्यांचेही काम मोठेच आहे. मी उमेदवारांची क्रमवारी ठरवली हे खरे आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे वृत्तपत्रातून जे काही प्रसिद्ध होत आहे त्याबद्दल माझा काहीही आक्षेप नसल्याचे डॉ. सानप यांनी सांगितले.

टॅग्स :marathiमराठी