शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ निर्माण महामंच विधानसभेच्या ४० जागा लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 20:35 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ निर्माण महामंचची कोर कमिटीची बैठक आमदार निवास येथील सभागृहात पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर विदर्भातील ६२ पैकी ४० जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देकोर कमिटीच्या बैठकीत निर्णय : पुढच्या बैठकीत जागा वाटप ठरणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ निर्माण महामंचची कोर कमिटीची बैठक आमदार निवास येथील सभागृहात पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर विदर्भातील ६२ पैकी ४० जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. वामनराव चटप होते. या बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, विदर्भ राज्य आंदोलन आघाडीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. नीरज खांदेवाले, महामंचचे समन्वयक श्रीकांत तराळ, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे अध्यक्ष राजेश काकडे, महासचिव चंद्रभान रामटेके, शंकर बर्मन, रोहित शाहू, प्रभाकर काळे, बीआरएसपीचे प्राचार्य रमेश पिसे, प्रेम म्हैसकर, हरिकिशन हटवार आदी उपस्थित होते.विदर्भवादी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, स्वतंत्र भारत पक्ष, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी व प्राऊटिस्ट ब्लॉक ऑफ इंडिया पार्टी या विदर्भवादी संघटनांद्वारे या ४० जागा लढविण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, रामटेक, कामठी, हिंगणा, उमरेड, नागपूर शहरातील पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर, मध्य नागपूर, अमरावतीमध्ये अमरावती, बडनेरा, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट, तिवसा, धामणगाव, वर्धा-हिंगणघाट, आर्वी, देवळी, पुलगाव, वर्धा, यवतमाळ- वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ, अकोला-बाळापूर, आकोट, पूर्व अकोला, मूर्तिजापूर, वाशीम- रिसोड, बुलडाणा-खामगाव, चिखली, सिंदखेडराजा, गडचिरोली-आरमोरी अहेरी, गोंदिया-तिरोडा, चंद्रपूर- राजुरा व वरोरा, भंडारा-भंडारा व तुमसर या जागा लढविण्यात येणार असून, पुढच्या बैठकीत कोणती संघटना कोणते मतदार संघ लढविणार, याची यादी तयार केली जाणार असल्याची माहिती समन्वयक राम नेवले यांनी दिली.

टॅग्स :Vidarbhaविदर्भElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा