शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचे आंदोलन रस्त्यावर दिसले पाहिजे!

By admin | Updated: April 4, 2016 02:09 IST

स्वतंत्र विदर्भासाठी राष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करण्याची गरज श्रीहरी अणे यांनी व्यक्त केली.

बुलडाणा : राज्यातील विविध पक्षांची भूमिका राजकीय स्वरूपाची आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करण्याची गरज असून, यासाठी विदर्भाचे आंदोलन रस्त्यावर दिसले पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे माजी महाधिवक्ता, विदर्भवादी विचारवंत अँड. श्रीहरी अणे यांनी रविवारी येथे व्यक्त केले.बुलडाणा जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित 'मीट द प्रेस' कार्यक्रमात अँड. अणे बोलत होते. कार्यक्रमाला जनमंचचे अँड. अनिल किल्लोर, अँड. दीपक पाटील, संदेश सिंगलकर, अँड. मुकेश सर्मथ, अँड. विजय साळवे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे उपस्थित होते. यावेळी अँड. अणे म्हणाले की, स्वतंत्र विदर्भाबाबत विविध राजकीय पक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. भाजपने विदर्भ राज्य देण्याचे आश्‍वासन दिले; मात्र त्या दृष्टीने ठोस पाऊले अद्याप उचलली नाहीत. त्यामुळे राजकीय पक्षाकडून अपेक्षा नाही; मात्र स्वतंत्र विदर्भासाठी जनआंदोलनाचे स्वरूप आल्यास राष्ट्रीय स्तरावर एक पर्यायी विश्‍वसनीय दबाव निर्माण करण्यात येईल. विदर्भासाठी होणार्‍या विविध आंदोलनांचे एकत्रीकरण होणे आवश्यक असून, राजकीय-अराजकीय संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. यासंदर्भात अकोला येथे लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वतंत्र विदर्भ ही जनमानसाची इच्छा आहे. या मुद्दय़ावर उभे असलेले उमेदवार निवडून येत नसले तरी जनमत घेतल्यास विदर्भाच्या बाजूने कौल मिळेल. यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. ५१ टक्क्यांपेक्षा कमी जनमत असल्यास विदर्भाची चळवळ बंद करण्यात येईल; मात्र स्वतंत्र विदर्भासाठी ५१ टक्क्यांपेक्षा जास्त जनमत असून, नागपूरसह मोठय़ा शहरांत जनमंच संस्थेने घेतलेल्या मतदानात ते दिसून आले आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाची चळवळ राष्ट्रीय स्तरावर नेण्याची गरज आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेकांनी बलिदान दिले; मात्र स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होणे ही काळाची गरज आहे. आता २९ हजार शेतकर्‍यांच्या बलिदानाचा विचार करणे आवश्यक आहे. सर्वांंगीण विकासासाठी लहान राज्य आवश्यक आहे. मोठय़ा राज्यात कृषी, सिंचन, विकासाचे प्रश्न सुटणार नसतील, तर लहान राज्य निर्माण करून ते सोडविणे आवश्यक आहे, असेही अँड. अणे यांनी सांगितले.