शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील दूध उत्पादन वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:44 IST

विदर्भातील दुधाच्या उत्पादन वाढीसाठी तसेच पशुधन संगोपनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून सकस वैरण क्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देअनुप कुमार : चारायुक्त शिवार अभियानाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील दुधाच्या उत्पादन वाढीसाठी तसेच पशुधन संगोपनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून सकस वैरण क्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे. विविध प्रकारच्या चाºयाच्या जातीचे संगोपन व संवर्धन केल्यास उपलब्ध असलेल्या पशुधनाला पुरेल एवढा चारा निर्माण करण्यासोबतच दूध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी चारायुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त तथा माफसुचे कुलगुरु अनुप कुमार यांनी केल्या.जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात पशुसंवर्धन विभागातर्फे चारायुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, मनरेगा उपायुक्त पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, एनडीडीबीचे प्रकल्प संचालक डॉ. सतीश राजू, डॉ. सुधीर कविटकर, डॉ. प्रवीण भालेराव, डॉ. उमेश हिरुळकर, डॉ. अनिरुद्ध पाठक आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त अनुप कुमार म्हणाले, पारंपरिक चाºयांच्या प्रजातीसह हिरवा चारा सायलेजद्वारा उपलब्ध करणे तसेच आजोलासारख्या चाºयाच्या प्रजातींना प्रोत्साहन दिल्यास दूध उत्पादन वाढवू शकते. शेतकºयांनी चारा उत्पादनाला प्राधान्य द्यावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत प्रोत्साहन आहे.दूध उत्पादन वाढविण्यासाठी चारायुक्त शिवार अभियान असल्याचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले. रोहयोचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.संचालन तांत्रिक अधिकारी डॉ. दीपक कडू यांनी केले. अंकुश केदार यांनी आभार मानले.एक एकरात दररोज २५० किलो वैरणएनडीडीबीचे प्रकल्प संचालक डॉ. सतीश राजू म्हणाले, एक एकरात दरारोज २५० किलो वैरण उत्पादन होऊ शकते. जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जनावरांचे पोषण योग्य रीतीने करणे आवश्यक आहे. दुभत्या जनावरांना हिरवा चारा, वाळला चारा आणि खुराक यांचा सकस व समतोल आहार दिल्याने उत्पादन क्षमता उच्च पातळीवर टिकवणे शक्य होते.संकल्पना शेतकºयांपर्यंत पोहचावीडॉ. सुधीर कविटकर यांनी चारा युक्त शिवाराला ही संकल्पात प्रत्येक शेतकºयांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. येणाºया काळात शेतकºयांच्या विकासाकरिता चारायुक्त शिवार अभियान वरदान ठरणार आहे. विदर्भात अभियानाला गती मिळाल्यास शेतकरी दुग्ध व्यवसायात प्रगती करू शकेल, असे त्यांनी सांगितले.