शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

हिवाळी अधिवेशनात गाजणार विदर्भातील प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2022 08:00 IST

Nagpur News येत्या सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विदर्भातील प्रश्न सोडविण्याच्या दिशेने यशस्वी प्रयत्न होण्याची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देसत्ताधारी व विरोधी पक्ष सज्ज, विदर्भवासीयांनाही अपेक्षा

कमल शर्मा

नागपूर : येत्या सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विदर्भातील प्रश्न सोडविण्याच्या दिशेने यशस्वी प्रयत्न होण्याची अपेक्षा आहे. सत्तापक्ष असलेले भाजप विदर्भाबाबत संवेदनशील असल्याचे सांगत विदर्भाची झोळी भरली जाईल, असा दावा करीत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष सुद्धा अभ्यास करून सत्तापक्षाला कोंडीत पकडण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सुद्धा उठण्याची शक्यता आहे.

 

विदर्भ विकास मंडळाचे अद्याप पुनरुज्जीवन नाही

संविधानाचे कलम ३७२-२ अंतर्गत विदर्भासह गठित वैधानिक विकास मंडळांचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजी संपला आहे.

- महाविकास आघाडीने अडीच वर्षांपूर्वी पुढाकार घेतला नाही. शिंदे-फडणवीस सरकारने आता पुनरुज्जीवनासाठी शिफारस केली आहे. परंतु अजूनही केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली नाही.

 

बॅकलॉग अजूनही कायम

- वर्ष १९९४ मध्ये इंडिकेटर व बॅकलॉगची गणना केली होती. आता राज्य सरकारचा असा दावा आहे की, अमरावती विभागातील तीन जिल्ह्यांमध्येच बॅकलॉग शिल्लक आहे.

- विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खड़क्कार यांच्या मते, अमरावती विभागात सिंचनाचा १,०३,१३२ हेक्टरचे अनुशेष आहे. अकोला, बुलढाणा व अमरावती जिल्हे प्रभावित आहेत.

- १९९४ मध्ये सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी १०० सिंचन प्रकल्पांपैकी केवळ ६७ भौतिकदृष्टीने पूर्ण आहेत. ३३ चे काम सुरू आहे.

- १९९४ ते २०२२ पर्यंत नवीन बॅकलॉग तयार झाला आहे. त्याच्या गणनेची कुठे चर्चाच नाही.

 

३१४ सिंचन प्रकल्प अपूर्ण

- ३१४ सिंचन प्रकल्पांचे काम अजूनही अपूर्ण आहे. ज्या ४४ सिंचन प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहे त्यांना १० ते १५ वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती.

- सिंचनासाठी पाइपलाइनने पाणी पोहोचवण्याच्या ३५ योजना (प्रकल्पही) थंडबस्त्यात आहेत.

- महाविदर्भ जनजागरणचे संयोजक नितीन रोंघे यांचे म्हणणे आहे की, २-३ वर्षात विदर्भातील ७० टक्के जमीन सिंचन योग्य करण्याचा दावा म्हणजे जनतेची थट्टा होय.

- दुरवस्थेतील मालगुजारी तलावांचा समावेश करून पूर्व विदर्भातील सिंचन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

महागड्या विजेमुळे उद्योगांचे पलायन

- विदर्भातील वीज उत्पादनाची क्षमता १७,०१० मेगावॉट आहे. मागणी केवळी १२०० मेगावॉट आहे.

- विदर्भात शेजारी राज्यांच्या तुलनेत वीज महाग आहे. त्यामुळे येथून उद्योगांचे पलायन होत आहे.

- आतापर्यंत ३६ पेक्षा अधिक उद्योगांचे पलायन झाले आहे.

रिफायनरीबाबत मौन

- विदर्भात पेट्रोकेमिकल रिफायनरीची व्यावहारिकता तपासण्यासाठी अद्याप पुढाकार सुद्धा घेण्यात आलेला नाही.

-महाराष्ट्रात येत असलेल्या रिफायनरीला तीन भागात विभाजित करून एक भाग विदर्भाला देण्याची घोषणा झाली. पण पुढाकार नाही.

- रिफायनरी आल्याने विदर्भाचा चेहरामोहरा बदलवून जाईल, असा वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांचा दावा आहे.

हे प्रश्न सुद्धा कायम आहेत

- नागपूर करारानुसार विदर्भाच्या खात्यात राज्याच्या एकूण २३ टक्के शासकीय नोकऱ्या अपेक्षित होत्या. परंतु विदर्भाची टक्केवारी जवळपास आठ टक्के इतकीच आहे.

- रस्ते विकासाचा आराखडा तयार करतानाच विदर्भावर अन्याय झाला आहे. विदर्भासाठी तुलनात्मकदृष्ट्या अतिशय कमी लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

- राज्याच्या नक्षल प्रभावित ३८ तालुक्यांपैकी ३७ तालुके विदर्भात आहेत. खनिज संपदेच्या बळावर विकास करून त्यावर नियंत्रण आणण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन