शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पुढचे पाच दिवस गारपीट, अवकाळीचे सावट, नागपुरात सर्वाधिक घसरला पारा

By निशांत वानखेडे | Updated: April 23, 2023 19:50 IST

विदर्भात उन्हाळी की पावसाळा हेच कळेना झाले आहे.

नागपूर : विदर्भात उन्हाळी की पावसाळा हेच कळेना झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले अवकाळीचे सत्र पुढचे पाच दिवस पुन्हा सुरू राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या २७ एप्रिलपर्यंत विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण, विजांचे गर्जन व वादळासह गारपीटही हाेण्याची शक्यता आहे. त्यानंतर दाेन दिवस ढगाळ वातावरण राहिल व पुढे परिस्थिती सुधारण्याचा अंदाज आहे.

यावर्षी १० एप्रिलपासून काही दिवस उन्हाचे चटके त्रासदायक ठरले हाेते. दिवसाचा पारा ३९ ते ४१ अंशाच्या आसपास राहिला. १९ एप्रिल राेजी नागपूरचे तापमान ४२ अंशावर गेले, जे या उन्हाळ्यात आतापर्यंत सर्वाधिक हाेते. विदर्भात चंद्रपूर, ब्रम्हपुरीसह अकाेला, वर्धा, वाशिम या शहरांचा पारा ४३ अंशाच्या वर गेला हाेता. २० एप्रिलपासून अवकाळीचे ढग आकाशात जमा झाले आणि पारा खाली घसरत गेला.रविवारी नागपूरचे कमाल तापमान सर्वाधिक ६ अंशाने घसरत ३५.३ अंशावर आले. त्यामुळे दिवसभर ढगांची गर्दी नसली तरी उन्हाची तीव्र जाणीव झाली नाही. शनिवारी गारपीटीसह पावसाने हजेरी लावली हाेती. त्यामुळे रविवारी सकाळी ८.३० वाजता पर्यंत नागपुरात १५.५ मिमी पावसाची नाेंद झाली. सकाळीही पावसाचे किरकाेळ थेंब पडले. त्यानंतर दिवसभर उघडीप दिली. त्यामुळे पावसासह उन्हापासूनही दिलासा मिळाला. शहरात रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा ५.५ अंशाने घसरत १९.४ अंशावर पाेहचले. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे.

नागपूरसह विदर्भातही पाऱ्याच्या घसरणीचा क्रम सुरू आहे. गाेंदियात ५.१ अंशाने घसरत ३५.५ अंश, वर्ध्यात ४.७ अंशाने घसरत ३७ अंश, चंद्रपुरात ३.८ अंशाने घसरत ३८.२ अंश तर अमरावती, अकाेल्यात ३.६ व ३.२ अंशाने घसरत ३७ व ३८.३ अंश कमाल तापमानाची नाेंद करण्यात आली. सर्व शहरात रात्रीचा पाराही २ ते ६ अंशापर्यंत घसरत २० ते २२ अंशापर्यंत नाेंदविण्यात आला आहे. वादळ व विजांची शक्यता लक्षात घेता नागरिकांना सावधगिरीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.