शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ बंदचा उडाला भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 09:57 IST

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ बंद पुकारण्यात आला होता. नागपुरात या बंदचा भडका उडाला.

ठळक मुद्देजुन्या भंडारा रोडवर दुकानांच्या काचा फोडल्या

हैदोस घालणाऱ्यांना नागरिक व पोलिसांनी दिला चोपसीताबर्डी परिसरात शांततेत आंदोलनआॅनलाईन लोकमतनागपूर :हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ बंद पुकारण्यात आला होता. नागपुरात या बंदचा भडका उडाला. सीताबर्डी परिसरात शांततेत तर गांजाखेत, इतवारी, तहसील परिसरात आंदोलनाने उग्र रूप धारण केले. या आंदोलनाला नागपुरात संमिश्र प्रतिसाद लाभला असला तरी विदर्भातील सर्वात मोठा धान्य बाजार असलेले कळमना मार्केट बंद राहिले, हे विशेष. अनेक विदर्भवाद्यांना यावेळी अटक करण्यात आली.विदर्भ राज्य आंदोलन समितीने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ बंदची हाक दिली होती. अनेक संघटनांनी या बंदला समर्थपणे पाठिंबा दर्शवित सहभाग नोंदविला. सोमवारी सकाळी शहीद चौक, सीताबर्डी, गांजाखेत आदी परिसरात विदर्भवादी संघटनांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. व्हेरायटी चौक येथून रॅली काढण्यात आली. या रॅलीमार्फत सीताबर्डी, झांशी राणी चौक, मुंजे चौक, मोदी नंबर १, २ व ३ या व्यावसायिक परिसरात फिरून व्यापाºयांना शांततेत आपली दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. अनेकांनी आपापली दुकाने स्वत:हून बंदही केली. या रॅलीमध्ये माजी आमदार वामनराव चटप, उपेंद्र शेंडे, राम नेवले आदींसह अडीचशेवर कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली मुंजे चौक, धंतोलीमार्गे लोकमतच चौकाकडे निघाली. लोकमत चौकात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरीकडे गांजाखेत, इतवारी येथे मात्र विदर्भवादी कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलन केले. इतवारी गांजाखेत येथे ख्वाजा शेख आणि मुकेश मासुरकर यांनी टायर जाळून निदर्शने केली. दरम्यान काही शोरूमच्या काचाही फोडण्यात आल्याने पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. गांजाखेत चौकात सकाळी काही युवकांनी रस्त्याच्या मध्ये टायर जाळून नारेबाजी केली. दरम्यान तोंडाला फडके बांधून आलेल्या युवकांनी परिसरातील कपड्यांच्या दुकानांवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत दुकानदार मनीष केवलरामानी आणि राजेश कुकरेजा यांच्या दुकानांचे काच फुटले. गांजाखेत चौक ते तीननल चौकापर्यंत आंदोलनात सहभागी असलेल्या युवकांनी बळजबरीने वाहनांना रोखले. इतवारी येथे हैदोस घालणाऱ्या युवकांना नागरिकांनीच चोप दिला. विदर्भ आंदोलनाच्या नावाने फिरत असलेल्या दोन तरुणांना तहसील पोलिसांनी अटक केली.या आंदोलनाला राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा, जनमंच, विदर्भ कनेक्ट, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रिपब्लिकन पार्टी (खोब्रागडे), भीमसेना, विदर्भ गण परिषद, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, माजी खासदार दत्ता मेघे यांची विदर्भ राज्य विकास परिषद, बहुजन सेना, बळीराजा पार्टी, झोपडपट्टी समस्या निवारण संघ, टायगर आॅटोरिक्षा संघटना, नाग-विदर्भ चेम्बर आॅफ कॉमर्स, अखिल हिंद फारवर्ड ब्लॉक आदीेंसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७