शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात कोरोना बाधितांची संख्या सात : ११ संशयितांची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 20:45 IST

दिलासा देणारी बाब म्हणजे, रविवारी नागपूरच्या मेयोतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) ४० नमुने तपासण्यात आले. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आलेत. यात मेडिकलच्या एका संशयित डॉक्टरचाही समावेश आहे. विदर्भात सोमवारी पुन्हा ११ संशयित रुग्णांची भर पडली.

ठळक मुद्देकोरोना संशयित डॉक्टर निगेटिव्ह : यवतमाळमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुबई प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आणखी एका रुग्णाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे यवतमाळ जिल्ह्यात बाधितांची संख्या तीन तर विदर्भात सात झाली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे, रविवारी नागपूरच्या मेयोतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) ४० नमुने तपासण्यात आले. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आलेत. यात मेडिकलच्या एका संशयित डॉक्टरचाही समावेश आहे. विदर्भात सोमवारी पुन्हा ११ संशयित रुग्णांची भर पडली.यवतमाळ जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण सोडल्यास विदर्भात नागपूरसह इतर ठिकाणी गेल्या दोन दिवसात एकही बाधित रुग्णाची नोंद झाली नाही. रविवारी मेडिकलमधील २९, मेयोमधील आठ, यवतामळ व चंद्रपूर जिल्ह्यामधील प्रत्येकी दोन-दोन असे एकूण ४१ नमुने तपासण्यात आले. यातील ४० नमुने निगेटिव्ह आले. तर यवतमाळ जिल्ह्यातील एका संशयित महिलेच्या नमुन्याची तपासणी सोमवारी करण्यात आली, यात ती पॉझिटिव्ह आली. विशेष म्हणजे, या पूर्वी पाठविण्यात आलेल्या या महिलेचा नमुन्यांचा अहवाल १३ मार्च रोजी निगेटिव्ह आला होता. परंतु पुन्हा साप, सर्दी, खोकला व अंगदुखी ही लक्षणे आढळून आल्याने रविवारी त्यांचे नमुने नागपुरात पाठविण्यात आले होते.सोमवारी पहिल्या टप्प्यात मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुन्यामध्ये नागपूर मेडिकलमधील तीन, मेयोमधील चार, वर्धेमधील एक तर खामगावमधील तीन असे एकूण ११ नमुन्यांचा समावेश होता. यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोनाVidarbhaविदर्भ