शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

उपराजधानीत वर्षभरात विना हेल्मेट ६१२ दुचाकीस्वारांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 11:12 IST

२०१९ या वर्षात विविध अपघातामध्ये जखमी झालेल्या ३६८४ चालकांना नागपूर मेडिकलच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान यातील ८०० चालकांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देमेडिकलच्या ‘ट्रॉमा’मधील वर्षभरातील आकडेवारी वाहन चालविताना मोबाईलवर बोलणेही ठरते मृत्यूला कारण

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विना हेल्मेट प्रवास जीवघेणा ठरतो, असे असताना देखील बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट टाळतात. परिणामी, अपघात झाल्यास मेंदूला जबर मार बसून गंभीर जखमी होतात. २०१९ या वर्षात विविध अपघातामध्ये जखमी झालेल्या ३६८४ चालकांना मेडिकलच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान यातील ८०० चालकांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, यात विना हेल्मेट चालकांची संख्या ६१२ होती.रस्ते अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मेडिकलने ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू केले. या सेंटरमध्ये गेल्या तीन वर्षांत जखमींची संख्या वाढली आहे. २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची चमू येथे कार्यरत असल्याने हे ‘सेंटर’ अनेकांसाठी वरदान ठरत आहे. परंतु अपघातांच्या वाढत्या संख्येने रुग्णांची संख्याही वाढली आहे. विशेष म्हणजे, हेल्मेटचा सक्तीचा वापर करण्याचा शासनाकडून प्रयत्न होत आहे. वाहतूक पोलीस विभागाकडून विना हेल्मेट चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करीत आहे. मात्र, हेल्मेटचे महत्त्व माहीत असताना सुद्धा बहुसंख्य दुचाकीचालक त्याच्याकडे ओझे म्हणून पाहतात. यामुळे चौकात पोलीस असतील तरच हेल्मेट घालण्याचे किंवा पळवाटा शोधण्याची वृत्ती वाढत असल्याने रस्ता अपघातात विना हेल्मेट वाहनधारक गंभीर जखमी होत असून मृत्यूच्या दारात पोहचत आहे.गेल्या वर्षभरात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ६१२ चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणेही २१ चालकांसाठी मृत्यूचे कारण ठरले.

जखमींमध्ये ९० टक्के चालक विना हेल्मेटजानेवारी ते डिसेंबरपर्यंत ट्रॉमा केअर सेंटरमध्ये येणाऱ्या जखमींची माहिती गोळा करण्यात आली आहे. यात रस्ता अपघातात जखमी झालेल्या ९० टक्के दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते. यातील ७६ टक्के जखमींना जीवाला मुकावे लागले. ही धक्कादायक वस्तूस्थिती आहे.डॉ. मोहम्मद फैजल, प्रमुख, आर्थाेपेडिक विभाग व ट्रॉमा केअर सेंटर

मोटारसायकल चालकाच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे हेल्मेट हे व्यक्तिगत सुरक्षेसाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु हेल्मेट नसताना आणि ४५ किमी प्रतितासाच्या वेगाने चालणाºया मोटारसायकलीवरून चालक खाली पडल्यास त्याला चारपट गतीने मार लागतो. यात डोक्याचे हाड तुटण्याची व मेंदूला जबर मार बसण्याची शक्यता असते. ‘रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये विना हेल्मेट असलेल्या चालकांची संख्या मोठी आहे. मेडिकलच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वारांच्या मृत्यूची संख्या पाहता हेल्मेटचे गांभीर्य आवश्यक आहे.-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल२० ते ४० वयोगटात सर्वाधिक मृत्यूट्रॉमा केअर सेंटरने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वात जास्त आहे. यात २० ते ४० या वगोटातील तरुण जास्त आहेत. अशा वयोगटातील तरुणांवरच त्यांच्या कुटुंबाची व वयोवृद्ध पालकांची जबाबदारी असते. त्यांच्या निधनाने त्यांचे अख्खे घर पोरके होऊन जात असते.

टॅग्स :Accidentअपघात