शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

नागपुरात हुंड्यासाठी घेतला पत्नीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 19:44 IST

माहेरून रक्कम आणून देण्यास नकार देणाऱ्या पत्नीला एका आरोपीने शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. एमआयडीसीच्या राय टाऊन परिसरात ही घटना घडली.

ठळक मुद्देतीन वर्षांपूर्वी झाले होते लग्न : पतीविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माहेरून रक्कम आणून देण्यास नकार देणाऱ्या पत्नीला एका आरोपीने शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. एमआयडीसीच्या राय टाऊन परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी निर्मल रणजी चॅटर्जी (वय ३६) या आरोपीविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.हिंगणा मार्गावरील राय टाऊनमध्ये राहणाऱ्या  मालविका निर्मल चॅटर्जी (वय ३१) यांनी १३ फेब्रुवारीला सकाळी गळफास लावून आत्महत्या केली होती. मूळचे रायपूर छत्तीसगड येथील रहिवासी असलेल्या मालविका आणि निर्मलचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. निर्मल येथील हिंगणा एमआयडीसीत कंपनीत कामाला होता. त्यामुळे हे दोघे भाड्याच्या सदनिकेत राहत होते. मुलबाळ झाले नसल्याने त्यांच्यात खटके उडायचे. त्यात मालविकाने माहेरून पैसे आणावे म्हणून निर्मल तिला त्रास देत होता. तर, माहेरून पैसे आणण्यास मालविका नकार देत होती. त्यामुळे तिच्या त्रासात भर पडत होती. त्याला कंटाळून अखेर मालविकाने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला तिचा पती निर्मल हाच जबाबदार असल्याची तक्रार मालविकाची बहीण तृप्ती प्रकाश भट्टाचार्य (वय ३६, रा. वैकूंठपूर, छत्तीसगड) यांनी एमआयडीसी पोलिसांकडे नोंदवली. त्यावरून सोमवारी रात्री पोलिसांनी आरोपी निर्मलविरुद्ध हुंडाबळी प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याWomenमहिला