नागपूर : बिल्डरला तीन लाखाचे कर्ज देऊन कोट्यवधीची संपत्ती हडपणाऱ्या राकेश डेकाटे आणि त्याच्या साथीदारांची शहरात एवढी दहशत होती की एका व्यक्तीला आत्महत्या करावी लागली होती. त्याच्या विधवा पत्नीने गुन्हे शाखेकडे डेकाटे आणि त्याच्या साथीदारांची तक्रार केली आहे.
पाच दिवसांच्या तपासातच पोलिसांना डेकाटे टोळीविरुद्ध चार तक्रारी मिळाल्या आहेत.
गुन्हे शाखेने राकेश डेकाटे, त्याचा भाऊ मुकेश डेकाटे, साथीदार महेश उर्फ गणेश साबणे तसेच मदन काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राकेश, गणेश आणि मदन पोलिसांच्या ताब्यात आहेत. आरोपींनी विवेकानंदनगर येथील रहिवासी मोहन दाणी यांना २०१० मध्ये ३ लाख रुपये १० टक्के व्याजाने दिले होते. त्यापूर्वीही २ लाख रुपये दिले होते. कर्ज घेतल्यानंतर दाणी आपल्या मुलाकडे अमेरिकेला गेले होते. तेथून परतल्यानंतर आरोपींनी त्यांना ८ लाखाची मागणी केली. राकेशने हिंगणा येथील दाणी यांच्या मालकीची ७.८ हेक्टर जमीन आपला भाऊ मुकेशच्या नावावर केली होती. कागदपत्र मागितल्यानंतर अपहरण करून घाट रोड येथील कार्यालयात त्यांना मारहाण केली. घराचे कागदपत्र घेऊन कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी घेतल्या. दाणी यांची तक्रार मिळताच ३१ जानेवारीला गुन्हे शाखेने राकेश आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. राकेश डेकाटे याच्याविरुद्ध शहरात २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. गुंडागर्दीमुळे त्याची शहरात दहशत आहे. त्या आड तो अवैध सावकारी करीत होता. राकेशसोबत गणेश साबणे हासुद्धा टोळीची कमान सांभाळतो. राकेश आणि त्याच्या साथीदारांच्या यातनांमुळे त्रस्त होऊन एका व्यक्तीने खूप दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. गुन्हे शाखेने कारवाईनंतर संबंधित महिलेस बयाण देण्यासाठी धीर दिला. याच पद्धतीने आपला विरोध केल्यामुळे संतप्त डेकाटे टोळीने गांधीनगरच्या एका रेस्टॉरंट संचालकाला पेट्रोल टाकून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित रेस्टॉरंट सोडून निघून गेला होता. राकेश आणि गणेश बजाजनगर ठाण्यांतर्गत कोट्यवधी रुपयांचा ताबा घेऊन एका नेत्याशी निगडीत आहेत. सूत्रांनुसार या नेत्याच्या इशाऱ्यावरूनच राकेश आणि गणेश गुंडागर्दी तसेच अवैध सावकारी करतात. शनिवारी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकताच या नेत्याने आपल्या व्यक्तींच्या माध्यमातून पोलीस तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांनी जबरदस्ती राकेशच्या घरात प्रवेश करून मारहाण केल्याचा प्रचार केला होता. परंतु पोलिसांच्या सक्तीमुळे त्याची डाळ शिजली नाही. बुधवारी न्यायालयात हजार केल्यानंतर डेकाटे टोळीशी निगडित नेते न्यायालयात आले. पोलिसांनी राकेश आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयात हजर करून १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.
...........
मकोका अंतर्गत कारवाईची मागणी
गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर डेकाटे टोळीमुळे पीडित चिंतेत आहेत. त्यांच्या मते या टोळीला राजकीय नेता आणि गुडांचा आश्रय आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईनंतरही ते आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आरोपींच्या मदतीने त्यांनी अनेक नागरिकांच्या संपत्तीवर ताबा मिळविला आहे. मकोकाची कारवाई करून आरोपींना धडा शिकविला जाऊ शकतो. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पुढाकाराने गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमुळे पीडितांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.
जुगार अड्ड्यातून कमाई
आरोपी बजाजनगर ठाणे परिसर आणि सीताबर्डी ठाण्यांतर्गत अमरावती मार्गावरील एका छतावर जुगार अड्डा चालवित होते. या अड्ड्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होत होती. नेता आणि चर्चेतील व्यक्तींचे येथे येणे-जाणे होते. राकेश आणि त्याच्या साथीदारानी फसवणुकीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमविली आहे. आर्थिक एजन्सीकडून तपास करून त्यांची संपत्ती जप्त केल्या जाऊ शकते.
...........