शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

उपराजधानीत वंदे मातरम्चा जयघोष

By admin | Updated: August 14, 2016 02:32 IST

भारत मातेचे तुकडे करण्याची भाषा करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा कन्हैया कुमार देशद्रोही असून...

कन्हैया देशद्रोही तर केजरीवाल ड्रामेबाज-मणिंदरजितसिंह बिट्टा : हजारो विद्यार्थ्यांचे सामूहिक गायन नागपूर : भारत मातेचे तुकडे करण्याची भाषा करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा कन्हैया कुमार देशद्रोही असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ड्रामेबाज राजकारणी आहेत, अशी टीका अखिल भारतीय दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष मणिंदरजितसिंह बिट्टा यांनी केली. मातृभूमी प्रतिष्ठान, नागपूरच्यावतीने अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शनिवारी सक्करदरा चौक येथे सामूहिक वंदे मातरम् गायनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दक्षिण नागपूर परिसरातील तब्बल ६९ शाळा - महाविद्यालयांमधील १० हजाराच्या वर विद्यार्थी सामूहिक वंदे मातरम् गायनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. बिट्टा यांनी कन्हैया कुमारची शहीद भगतसिंह यांच्याशी तुलना केल्यावरुन काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यावरही टीका केली. भगतसिंह विद्यार्थी नेता होते. त्यांनी अवघ्या २३ व्या वर्षी हसत हसत देशासाठी मरण पत्करले. दुसरीकडे जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया भारत तोडण्याची भाषा करतो. सीमेवर सैनिक शहीद होत असताना जेएनयूच्या कॅम्पसमध्ये अफजल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात होत्या. भारताचे तुकडे करण्याची भाषा बोलणारे देशद्रोही आहेत, असे मत बिट्टा यांनी व्यक्त केले. केजरीवाल यांच्यावरही बिट्टा यांनी टीका केली. देशातील भ्रष्टाचाराच्या विरोधात केजरीवालांनी आंदोलन सुरू केले. त्यावेळी आम्हीही त्या आंदोलनात सहभागी झालो होतो. मात्र त्यानंतर आमचा भ्रमनिरास झाला. उपोषणावर बसलेले केजरीवाल भूक लागताच देश्भक्ती विसरल्याचा आरोप बिट्टा यांनी केला. यावेळी बिट्टा यांनी, ‘काश्मीर देणे तर दूर पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेऊ’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची असून येथून देशभक्तीची प्रेरणा मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. याची जाण ठेवून देशप्रेमाची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी के ले. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर सतीश होले, आमदार नागो गाणार, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, मनपा स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, नगरसेवकांमध्ये दीपक कापसे, चेतना टांक, शीला कराळे, स्वाती आखतकर, सुजाता कोंबाडे, मनपा सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, कल्पना पांडे, रमेश सिंगारे, कैलास चुटे, प्रशांत तुंगार, संजय भेंडे, सागर गोडबोले, सत्यजीत दस्तुरे, मोहन अग्निहोत्री, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुक्कावार, कार्यक्रमाचे आयोजक डॉ. रवींद्र भोयर, दीपक धुरडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अभिजित मुळे यांनी केले. दिव्या धुरडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) ना. गडकरी यांचे कौतुक रामसेतूला ऐतिहासिक सत्य नसल्याचे सांगत इतिहासकार व काही राजकारण्यांनी रामसेतू तोडण्याचा घाट आखला होता. त्यावेळी आम्ही सर्व आंदोलनाच्या तयारीला लागलो होतो. मात्र नितीन गडकरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रामसेतू अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत एम.एस. बिट्टा यांनी ना. गडकरी यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. देशवासीयांना स्फूर्ती मिळते नितीन गडकरी यांनी वंदे मातरम्मुळे देशवासीयांना स्फूर्ती मिळत असल्याचे सांगितले. स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. त्यासाठी अनेकांना सर्वस्व त्यागावे लागले. अथक परिश्रमाने मिळालेले स्वातंत्र्य टिकवायचे आहे. स्वातंत्र्याचे रूपांतर सुराज्यात करायचे आहे. भारताला सुखी, संपन्न व शक्तिशाली राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले. शेजारी पाकिस्तान भारताला युद्धात हरवू शकत नाही. त्यामुळे दहशतवादी पाठवून आमचे ऐक्य तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र देशभक्त भारतवासी त्यांचे मनसुबे खरे ठरू देणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.