शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा यवतमाळ, वर्धा दौरा स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 06:49 IST

M. Venkaiah Naidu : उपराष्ट्रपती नायडू ४ जानेवारी रोजी सकाळी हवाई दलाच्या विशेष विमानाने नागपुरात दाखल होऊन हवाईदलाच्या विशेष हेलिकाॅप्टरने वर्धा - सेवाग्रामला जाणार होते.

नागपूर : भारताचे उपराष्ट्रपती महामहीम एम. व्यंकय्या नायडू ४ जानेवारी रोजी यवतमाळ व वर्धा जिल्ह्याच्या दाैऱ्यावर येणार होते. तसे नियोजनही करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले असून, सार्वजनिक कार्यक्रमात ५०पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीस मनाई केली आहे. यामुळे उपराष्ट्रपतींचा दौरा स्थगित करण्यात आला आहे.

उपराष्ट्रपती नायडू ४ जानेवारी रोजी सकाळी हवाई दलाच्या विशेष विमानाने नागपुरात दाखल होऊन हवाईदलाच्या विशेष हेलिकाॅप्टरने वर्धा - सेवाग्रामला जाणार होते. तेथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील कार्यक्रम आटोपून ते यवतमाळला रवाना होणार होते. जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी, यवतमाळद्वारा संचालित लोहारा येथील वीणादेवी दर्डा स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार होते.

या कार्यक्रमानंतर स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रेरणास्थळ आणि मातोश्री वीणादेवी दर्डा यांचे समाधीस्थळ असलेल्या तुलसी वृंदावन येथे उपराष्ट्रपती पुष्पांजली वाहणार होते. सोबतच ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काढलेला विशेषांक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या समाधीस्थळी अर्पण करण्यात येणार होता.

ऐतिहासिक हनुमान आखाडा येथे उभारलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरणही त्यांच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमांसाठी जय्यत तयारीही होती. पोलीसांनीही मॉकड्रील सराव केला होता. मात्र, कोरोना निर्बंध लागू झाल्यामुळे उपराष्ट्रपती कार्यालयाने राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतर दौरा स्थगित केला. 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू