शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

टेलिस्कोपने घडविले शुक्र, मंगळ, शनि अन् गुरुचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 10:51 IST

गांधीसागर येथील रमण विज्ञान केंद्रात ‘स्पेस विक’चे आयोजन करण्यात आले आहे. सध्या शुक्र (व्हीनस), मंगळ (मास), गुरु (ज्युपिटर) आणि शनि (सॅटर्न) हे चारही ग्रह एकाच रांगेत आलेले असून ते टेलिस्कोपने पाहता येऊ शकतात.

ठळक मुद्दे‘सायन्स आॅन अ स्पिअर’ग्रहांविषयीच्या चित्तथरारक माहितीने थक्क झाले नागरिक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्र हा ग्रह सूर्याच्या अतिशय जवळचा ग्रह असून त्याचे तापमान ४८० डिग्री सेल्सियस राहते, मंगळावर २५ किलोमीटर उंचीचा म्हणजे एव्हरेस्टपेक्षा चौपट उंच पहाड आहे, गुरु हा ग्रह १३ लाख पृथ्यीच्या क्षमतेएवढा आहे अन् शनी या ग्रहावर खूप अधिक गॅस आहेत, अशी चित्तथरारक माहिती जाणून नागरिक थक्क झाले. माहिती दिल्यानंतर नागरिकांना रमण विज्ञान केंद्रात टेलिस्कोपच्या साहाय्याने या चार ग्रहांचे दर्शनही घडविण्यात आले.गांधीसागर येथील रमण विज्ञान केंद्रात ‘स्पेस विक’चे आयोजन करण्यात आले आहे. सध्या शुक्र (व्हीनस), मंगळ (मास), गुरु (ज्युपिटर) आणि शनि (सॅटर्न) हे चारही ग्रह एकाच रांगेत आलेले असून ते टेलिस्कोपने पाहता येऊ शकतात. हा दुर्मिळ योग असून हे ग्रह वर्षभरात कधी एका रांगेत येत नसल्याची माहिती रमण विज्ञान केंद्राचे विलास चौधरी यांनी दिली. यावेळी आॅडिटोरियममध्ये नागरिकांना वरील चारही ग्रहांची माहिती तांत्रिक अधिकारी महेंद्र वाघ यांनी दिली. ते म्हणाले, शुक्र हा चंद्रानंतर लकाकणारा दुसरा ग्रह आहे. याला प्रेमाची देवता असेही म्हणतात. या ग्रहावरील तापमान नेहमी ४८० डिग्री सेल्सियस राहते. येथील वातावरणात कार्बनडाय आॅक्साईड, सल्फर डाय आॅक्साईड, नायट्रस आॅक्साईड हे वायू असतात. हे वायू तापमानाला धरून ठेवण्याचे काम करतात. स्वत: भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी या ग्रहाला २४३ दिवस लागतात. पृथ्वीवरील आणि शुक्रावरील बहुतांश बाबीत साम्य असते. या ग्रहावर अ‍ॅसिडचा पाऊस पडत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मंगळ (मास) या ग्रहावरीलही बहुतांश बाबी पृथ्वीसारख्याच आहेत. येथे पाणी आढळत नाही तर जेथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही तेथे पाणी बर्फाच्या रुपात आढळते. या ग्रहावर मॉन्स ओलंपस या नावाचा २५ किलोमीटर उंचीचा पहाड आहे. या ग्रहाचे तापमान पृथ्वीएवढे असल्याचे त्यांनी सांगितले. रमण विज्ञान केंद्रात १२ आॅक्टोबरपर्यंत स्पेस विक साजरा करण्यात येत असून नागरिकांना या चारही ग्रहांबद्दल माहिती देऊन त्यांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

गुरुवर सामावतात १३ लाख पृथ्वीसामान्यपणे पृथ्वी ही फार मोठी आहे असे आपल्याला वाटते. परंतु गुरु या ग्रहावर १३ लाख पृथ्वी सामावू शकतात, अशी माहिती महेंद्र वाघ यांनी देताच उपस्थित नागरिक थक्क झाले. ते म्हणाले, गुरुवर माणसाचे वजन पृथ्वीवरील वजनाच्या तिप्पट होते. तो सूर्याकडून ूऊर्जा घेतो. अलीकडे ३०० वर्षापासून या ग्रहावर लाल रंगाचा डाग आढळत आहे. शनि हा ग्रह पृथ्वीपेक्षा ९० पट मोठा असून भविष्यात या ग्रहावर जीव उत्पत्ती होऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी लुटला ग्रह पाहण्याचा आनंदआॅडिटोरीयममध्ये शुक्र, गुरु, शनि आणि मंगळ या ग्रहांची शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यानंतर नागरिकांनी रमण विज्ञान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ हे ग्रह पाहण्याचा आनंद लुटला. मोठ्या आकाराचे टेलिस्कोप रमण विज्ञान केंद्राने हे ग्रह पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले होते. ग्रह दर्शनानंतर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना यावेळी उत्तरे देण्यात आली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र