शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील वाहन पार्किंग  आता दुपटीने महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:05 IST

महानगरातील वाहतूक आणि वाहनांची संख्या आता एवढी वाढलीय की, मुख्य बाजारपेठेच्या क्षेत्रात वाहन पार्किं ग करणे म्हणजे जणू दिव्यच ठरावे. नाईलाजाने वर्दळीच्या रस्त्यावर कडेलाच वाहन पार्किंग करून नागरिकांना कामे उरकावी लागतात. अशातच अनेकदा वाहतूक विभागाकडून वाहन चालान होतात. यातून दिलासा मिळण्यासाठी मनपा बाजार विभागाकडून काही व्यापारपेठांमध्ये पार्किंग प्लाझांची निर्मिती करण्यात आली आहे. मागील वर्षापर्यंत या पार्किंग स्थळांवर जुन्या दरानुसारच आकारणी व्हायची. मात्र आता याच ठिकाणी वाहन पार्किंग करण्यासाठी दुप्पट ते तिप्पट पैसे भरावे लागणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत होणार चर्चा : मनपा बाजार विभागाने आणला वाढीचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरातील वाहतूक आणि वाहनांची संख्या आता एवढी वाढलीय की, मुख्य बाजारपेठेच्या क्षेत्रात वाहन पार्किंग करणे म्हणजे जणू दिव्यच ठरावे. नाईलाजाने वर्दळीच्या रस्त्यावर कडेलाच वाहन पार्किंग करून नागरिकांना कामे उरकावी लागतात. अशातच अनेकदा वाहतूक विभागाकडून वाहन चालान होतात. यातून दिलासा मिळण्यासाठी मनपा बाजार विभागाकडून काही व्यापारपेठांमध्ये पार्किंग प्लाझांची निर्मिती करण्यात आली आहे. मागील वर्षापर्यंत या पार्किंग स्थळांवर जुन्या दरानुसारच आकारणी व्हायची. मात्र आता याच ठिकाणी वाहन पार्किंग करण्यासाठी दुप्पट ते तिप्पट पैसे भरावे लागणार आहे.मनपा पार्किंग धोरण-२०१६ अंतर्गत पार्किंगचे दर मनपाच्या बाजार विभागाने पार्किंग प्लाझामध्ये लागू केले आहेत. यानुसार, दुचाकी वाहनधारकांना पहिल्या एका तासासाठी १० रुपये, दोन तासांसाठी २० रुपये आणि चार तासांसाठी ३० रुपये मोजावे लागणार आहेत. आतापर्यंत ही आकारणी फक्त १० रुपये होती. सायकल आणि हातठेल्यांच्या दराबद्दल काही निर्णय झालेला नाही. ऑटो रिक्षासाठी आतापर्यंत २० रुपयांची आकारणी होती. यापुढे एक तासासाठी १० रुपये, दोन तासांसाठी ३० रुपये आणि चार तासांसाठी ४० रुपये मोजावे लागणार आहेत. तर, कार-जीपकरिता एक तासासाठी ३० रुपये, दोन तासांसाठी ७० रुपये आणि चार तांसासाठी ८० रुपये आकारणी होणार आहे. आधी ही आकारणी २० रुपये होती. बस, मिनी बस आणि ट्रक-टेम्पोला एक, दोन आणि चार तासासाठी अनुक्रमे ५०, ११० आणि १४० रुपये दर ठरविण्यात आला आहे. शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.या प्रस्तावावर काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. दरवाढीचा हा प्रस्ताव तर्कसंगत नसल्याने यातून फारसे काही साध्य होणार नसल्याचे त्यांचे मत आहे. मनपाचे काम कमाई करण्याचे नसून नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे असल्याची भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे बैठकीतील चर्चेनंतर प्रस्तावित दरांमध्ये काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे.असे असतील पार्किंग निविदांचे नवे दरप्राप्त माहितीनुसार, गांधीबाग झोनच्या बडकस चौक पार्किंग प्लाझाच्या निविदेचे दर ६.२८ लाखांवरून ११.४२ लाख, धरमपेठ झोनच्या सुपर मार्केट पार्किंग स्टँडच्या निविदेचा दर १०.५६ लाखांवरून १९.२० लाख, धंतोली झोन अंतर्गत नवीन एसटी स्टँड, शेतकरी भवनामागील पार्किंगची निविदा ११.५५ लाखांवरून २१ लाख, तर धरमपेठ झोन अंतर्गत नेताजी मार्केट पार्किंगची निविदा ३.३२ लाखांवरून ६.०४ लाखांवर नेण्याचाही स्थायी समितीचा प्रस्ताव आहे.मनपा कर्मचाऱ्यांनाही द्यावे लागणार शुल्कमनपाचे कर्मचारी पार्किंगमध्ये नि:शुल्क वाहन पार्क करतात. मात्र यापुढे त्यांनाही शुल्क द्यावे लागणार आहे. सायकलसाठी ३० रुपये आणि स्कुटरसाठी ५० रुपये दरमहा द्यावे लागतील. त्यासाठी पास घ्यावा लागेल. या व्यतिरिक्त दररोज सायकलसाठी एक रुपया आणि स्कुटरसाठी दोन रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाParkingपार्किंगInflationमहागाई