लाेकमत न्यूज नेटवर्क
पाटणसावंगी : ग्रामीण भागात वाहन चाेरीचे प्रमाण वाढत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहन चाेरट्या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या दाेन माेटरसायकली व एक मॅस्ट्राे अशी तीन वाहने जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. ८) मध्यरात्री करण्यात आली.
नीलेश राधेश्याम गुजवार (२३, रा. जाऊरवाडा-काकडा, ता. कारंजा-घाडगे, जिल्हा वर्धा), सचिन राजेंद्र गिरी (२१, रा. पिपळा-कबर, ता. सौंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) व रुपम प्रल्हाद गणोरकर (२०, रा. रिवा कॉलनी, खैरगाव, ता. सौंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सावनेर परिसरात गस्तीवर असताना त्यांना तिघेही केळवद (ता. सावनेर) शिवारात संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे आढळून आले.
ते लपून बसले असल्याने पाेलिसांना संशय आला आणि त्यांनी सापळा रचून तिघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. चाैकशीदरम्यान, तिघेही वाहनचाेर असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी त्यांना अटक केली. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून प्रत्येकी ५० हजार रुपये किमतीच्या दाेन माेटरसायकली व एक मॅस्ट्राे असा एकूण १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली असून, त्यांच्याकडून वाहन चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक नरेंद्र गाैरखेडे, सहायक फाैजदार बाबा केचे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.