इंदिराबाई विनोद रामटेके (५५) रा. प्लॉट नं. ३, सुगतनगर, शनिवार बाजारासमोर, पॉवरग्रीड चौक असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या भाजी विकून उपजीविका करतात. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता भाजी विकून त्या पायी आपल्या घरी जात होत्या. चिखली उड्डाणपुलाजवळ आरटीओ कार्यालयासमोरील रोडवर चारचाकी वाहन क्रमांक आर. जे. २३, एल. एस. ३५७३ चा चालक बजरंगलाल गोपाळराव गुजर (२७) रा. दाभा वाडी याने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे भरधाव वेगाने चालवून इंदिराबाई यांना धडक दिली. धडक देऊन वाहनचालक पळून गेला. इंदिराबाईंना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. इंदिराबाईंचा मुलगा प्रफुल विनोद रामटेके (३०) याने दिलेल्या तक्रारीवरुन कळमना पोलिसांनी आरोपी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
..................