शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
5
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
6
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
7
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
8
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
9
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
10
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
11
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
12
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
13
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
14
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
15
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
16
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
17
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
18
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
19
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
20
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...

कुलगुरूंच्या नव्या टीमची ‘परीक्षा’

By admin | Updated: October 6, 2015 03:57 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना १९ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. उन्हाळी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना १९ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. उन्हाळी परीक्षांदरम्यान परीक्षा विभागाची कामगिरी फारच सुमार राहिली होती अन् विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनात विभाग सपशेल अनुत्तीर्ण झाला होता. विद्यापीठात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या नेतृत्वातील नव्या ‘टीम’समोर या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचे मोठे आव्हान असून खऱ्या अर्थाने त्यांचीदेखील परीक्षा होणार आहे.विद्यापीठाचे रखडणारे मूल्यांकन आणि उशिरा लागणारे निकाल यामुळे नेहमीच टीकेचा भडीमार करण्यात येतो. उन्हाळी परीक्षांचे निकाल तर नको तितके लांबले. यंदाच्या परीक्षांपासून ‘आॅनलाईन’ मूल्यांकन करण्यात येणार आहे. हा पहिलाच प्रयोग असल्याने विद्यापीठाने सावध भूमिका घेतली आहे. सुमारे वर्षभरानंतर विद्यापीठाला डॉ.नीरज खटी हे पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक लाभले आहेत. शिवाय प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले हेदेखील परीक्षा विभागाकडे लक्ष ठेवून आहेत. १९ पासून सुरू होणाऱ्या या परीक्षेत जवळपास ६५० परीक्षांचा सहभाग असून ८६ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात ७० तर दुसऱ्या टप्प्यात ३८ परीक्षा घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)वेळापत्रकानुसार होणार परीक्षा४यंदा सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा नियमित वेळेत सुरू होत आहेत. यासाठी परीक्षा भवनातील अधिकारी व कर्मचारी अगोदरपासूनच कामाला लागले होते. मागील वर्षी प्रश्नपत्रिका तयार न झाल्यामुळे वेळेवर परीक्षेचे वेळापत्रक बदलवावे लागले होते. यामुळे परीक्षा आणि निकालाच्या तारखाही पुढे गेल्या होत्या. यंदा मात्र संपूर्ण काळजी घेण्यात आली असून हिवाळी परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच पार पडतील असा विश्वास प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.यंदापासून ‘आॅनलाईन’ मूल्यांकन होणारच!४हिवाळी परीक्षांपासून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ‘आॅनलाईन’ पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी ‘एमकेसीएल’च्या सुविधांचा वापर करण्यात येणार आहे. याअगोदर विद्यापीठाने आॅनलाईन फेरमूल्यांकनाचा प्रयोग केला होता. परंतु त्यात फारसे यश मिळाले नव्हते. त्यामुळे यंदा ही प्रक्रिया सुरळीत पार पडणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु विद्यापीठ यासाठी पूर्ण तयारी करत असून हा प्रयोग यशस्वी करून दाखविणारच असा दावा प्र-कुलगुरू डॉ.येवले यांनी केला आहे.