शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

वासनकरला चौथ्यांदा न्यायालयाचा फटकार

By admin | Updated: January 24, 2017 02:45 IST

आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी लुबाडणूक केल्याप्रकरणी

एमपीआयडी न्यायालय : जामीन अर्ज फेटाळला नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी लुबाडणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर येथील वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचे सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर याचा चौथ्यांदा जामीन अर्ज एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. या प्रकरणातील फिर्यादी लक्ष्मीनगर येथील रहिवासी विवेक अशोक पाठक यांच्या तक्रारीवरून ९ मे २०१४ रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात प्रशांत वासनकर याच्यासह नऊ जणांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ५०६, १२० (ब) आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. २७ जुलै २०१४ रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रशांत वासनकर, त्याचा भाऊ विनय वासनकर आणि अभिजित चौधरी, अशा तिघांना अटक केली होती. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने वार्षिक ४० ते १५० टक्के जादा व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने, ४८ महिने, पर्क, लिक्विड अशा वेगवेगळ्या आकर्षक योजनांतर्गत गुंतवणूकदारांच्या २००८ पासून मोठमोठ्या रकमांच्या ठेवी स्वीकारल्या. या ठेवींपैकी ३० टक्के चेकद्वारे आणि ७० टक्के रोखेने होत्या. वासनकरने मुदत संपूनही ठेवी आणि परतावा परत न करता ठेवीदारांची फसवणूक केली होती. आतापर्यंत ६८२ गुंतवणूकदारांनी रीतसर तक्रारी नोंदवलेल्या असून, फसवणुकीची रक्कम १८१ कोटी २५ लाख रुपये झालेली आहे. प्रशांत वासनकर याचा तिसऱ्यांदा जामीन फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा त्याला उच्च न्यायालयाने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या संदर्भात ठोस प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते आणि परत एमपीआयडी विशेष न्यायालयाकडे पाठविले होते. त्यानुसार वासनकर याने पैसे परत करण्याच्या संदर्भात प्रस्ताव सादर करून, आपणास केवळ ३० कोटी रुपये देणे असल्याचे त्याने सांगितले होते. आपणास जामिनावर सोडल्यास आहेत त्या मालमत्ता आणि ‘गुडविल’ विकून पैसे परत करतो, असे त्याने सांगितले. यावर सरकार पक्षाने तीव्र आक्षेप घेतला होता. तो पुन्हा दिशाभूल करीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास येताच त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील कल्पना पांडे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)