शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

वरुण गांधी भाजपाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:55 IST

एकेकाळी भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये मोजले जाणारे व युवकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून प्रोजेक्ट केले जाणारे खासदार वरुण गांधी यांची शुक्रवारी भाजपाकडून फारशी दखल ....

ठळक मुद्देस्वागतासाठी मोठे नेते नाहीत : कार्यकर्त्यांचीही गर्दी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये मोजले जाणारे व युवकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून प्रोजेक्ट केले जाणारे खासदार वरुण गांधी यांची शुक्रवारी भाजपाकडून फारशी दखल न घेण्यात आल्याचे पहायला मिळाले. एका कार्यक्रमासाठी नागपुरात आलेल्या वरुण गांधी यांच्या स्वागतासाठी भाजपाचे मोठे नेते तर दूरच पण एरव्ही विमानतळावर हारतुरे घेऊन आघाडीवर राहणारे सक्रिय कार्यकर्तेही पोहचले नाहीत. भाजपाकडून गांधी यांना अशी वागणूक का मिळाली हा चर्चेचा विषय ठरला आहे.भाजपाच्या राजकारणात नागपूरचे वाढलेले महत्त्व विचारात घेता येथे येणाºया भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचे जोशात स्वागत होत असल्याचे पहायला मिळते. वरुण गांधी यांचे दुपारी १२ च्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे नेते उपस्थित नव्हते. हे चित्र पाहून तेथे उपस्थित त्यांच्या समर्थकांनाही धक्का बसला. त्यानंतर गांधी हे एका हॉटेलमध्ये पोहचले. तेथेही त्यांच्या भेटीसाठी भाजपाचे नेते किंवा कार्यकर्ते पोहचले नाहीत. विधानसभा अधिवेशन सुरू असल्यामुळे सर्व आमदार मुंबईत आहेत. त्यामुळे मोठे नेते उपस्थित नव्हते, असा खुलासा भाजपाच्या एका नेत्याने केला.मात्र, स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, नगरसेवक यांनीही सपशेल पाठ फिरविली. भाजपाकडून न मिळालेला प्रतिसाद वरुण गांधी यांनाही खटकल्याचे जाणवले. त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी असे काहीच नाही म्हणत विषय टाळला.शेतकºयांच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील असावेप्रत्येक राज्य सरकारने शेतकºयांच्या प्रश्नांवर संवेदनशील असले पाहिजे. मग तो प्रश्न कृषी अनुदानाचा असो की कर्जमाफीचा. उत्तर प्रदेशमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकºयांना मदत करण्यासाठी आपण स्वत: सव्वा कोटी रुपये दिले. त्यानंतर दानदात्यांकडून २६ कोटी रुपये गोळा करून ते सुमारे चार हजार शेतकºयांना वितरित करण्यात आले, असेही गांधी यांनी सांगितले.कुणाच्या आशीर्वादाशिवाय तरुणांनाराजकारणात पद मिळत नाहीदेशात अनेक तरुण व सामान्य लोक आहेत, ज्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, गुणवत्ता आहे. मात्र, त्यांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी खूप धडपड करावी लागते. जोवर एखाद्या बड्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळत नाही तोवर युवकांना राजकारणात महत्त्वाचे पद मिळत नाही. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे, असे मत वरुण गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. देश स्वतंत्र झाला तेव्हा भारतीयांचे सरासरी वय ३८ होते. आता ते कमी होऊन २४ वर आले आहे. देश तरुण झाला आहे. दुसरीकडे त्यावेळी खासदारांचे सरासरी वय ४५ होते. ते आता ५९ पर्यंत वाढले आहे. ही दरी भरावी लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. खासदारांचे वेतन व भत्ते ठरविण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा. वेतन वाढविण्याचा अधिकार खासदारांना नसावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.