शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगणेशाला नानाविध मोदकांचा भोग : दररोज अडीच हजार किलो मोदकांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 23:36 IST

बाप्पाच्या आगमनात हा आनंद आणखी द्विगुणित केला तो बाजारातील वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांनी. नानाविध प्रकारचे हे मोदक सर्वांचे लक्ष वेधत असून बाप्पाला रोज वेगवेगळ्या मोदकांचा आस्वाद मिळत आहे.

ठळक मुद्देवेगवेगळ्या अर्पणाचे भाविकांना आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सव म्हणजे सळसळत्या उत्साहाचे पर्व. या काळात जागोजागी सजावट आणि वेगवेगळ्या पक्वान्नांचा दरवळ सर्वत्र पसरला असतो. पण या उत्साहात आनंद देतो तो बाप्पाचा आवडता मोदक. श्रीगणेशालाही या मोदकाची खास आवड आणि त्याचे आवडते भोग अर्पण करण्याचा भक्तांनाही मनस्वी आनंद. बाप्पाच्या आगमनात हा आनंद आणखी द्विगुणित केला तो बाजारातील वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांनी. नानाविध प्रकारचे हे मोदक सर्वांचे लक्ष वेधत असून बाप्पाला रोज वेगवेगळ्या मोदकांचा आस्वाद मिळत आहे.विशिष्ट आकार असलेले हे मोदक तसे सर्वांनाच भावणारे पण त्यात वेगवेगळ्या पदार्थाचे फ्लेवर घालून त्याचा स्वाद मिठाई निर्मात्यांनी अधिकच चवदार केला आहे. याच पदार्थांच्या नावाने मोदकांचेही नामकरण झाले आहे. सर्वसाधारणपणे सुके (ड्राय) मोदक आणि पुरण मोदक हे सर्वाधिक चलनात असलेले प्रकार पण आता नव्या प्रकारांनीही भाविकांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये ‘चुरमा मोदक’, ‘मसाला मोदक’, सुक्या मेव्यापासून निर्मित ‘ड्रायफ्रुट मोदक’, चॉक लेटचा स्वाद असलेले ‘चॉकलेट मोदक’ व याबरोबर केसरी मोदक, मलाई मोदक हेही खास आकर्षण ठरले आहेत. फळांचे फ्लेवर असलेले मँगो मोदक, ऑरेंज मोदक, कोकोनट मोदक आणि काजू मोदकांनी या स्वादात भर घातली आहे. शहरात आणखी प्रकारचे मोदकही भाविकांच्या पसंतीस पडत आहेत. देशातील विविध भागात प्रचलित असलेल्या मोदकांनाही खास मागणी आहे. विशेषत: त्या त्या प्रदेशात राहणाऱ्या रहिवाशांकडून मागणी केली जाते. बंगाली नागरिकांचा सोंदेश मोदक लक्ष वेधून घेतो.गणेशोत्सव हा विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबांचा लाडका देव मानला जातो. त्यामुळे मोदकांचे भावही सर्वसामान्य माणसांच्या अवाक्यात राहतील याची काळजी मिठाई दुकानदारांनी घेतल्याचे दिसते. ३८० रुपये किलोप्रमाणे ड्राय मोदक व ३९९ रुपये किलोप्रमाणे पुरण मोदकांपासून ५२४ रुपये किलोप्रमाणे चॉकलेट तर सर्वाधिक ८८० रुपये किलोप्रमाणे सुका मेव्याचे मोदक भक्तांना आवडत आहेत. राम भंडारचे शंभू सोनी यांनी सांगितल्याप्रमाणे भाविक दररोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नेऊन बाप्पाला अर्पण करताना दिसतात. आपल्या शक्तीप्रमाणे कुणी एक पाव तर कुणी अर्धा किलो वेगवेगळ्या प्रकारचे मोदक दररोज खरेदी करतो. शहरात दररोज अडीच हजार किलोच्यावर मोदकांची खरेदी भाविकांकडून होत असल्याचे सोनी यांनी सांगितले.अनेक भाविक श्रद्घापूर्वक आपल्या घरीच मोदक तयार करून बाप्पाला देत असल्याचेही दिसून येते. त्यामुळे सर्व प्रकारचे पदार्थांची उलाढाल लक्षात घेता या गणेशोत्सव काळात बाजारातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.निरोपाच्या वेळी मोदकांची शिदोरीदीड दिवस, पाच दिवस किंवा दहा दिवस बाप्पाला घरी विराजमान केल्यानंतर निरोपाची वेळ प्रत्येकांसाठी भावनिक असतो. श्रीगणेशालाही निरोपाच्या वेळी मोदकांची शिदोरी बांधून देण्याची भावनिकता दिसून येत आहे. नवीन स्वच्छ कापडात मोदकांची शिदोरी बांधून दिली जाते.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवnagpurनागपूर