शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

चिमुकल्यांनी दाखविल्या अभिव्यक्तीच्या विविध तऱ्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST

- बहुजन रंगभूमीचा बालनाट्य महोत्सव : तीन बाल एकांकिकांचे सादरीकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बहुजन रंगभूमीने ३० वर्षे ...

- बहुजन रंगभूमीचा बालनाट्य महोत्सव : तीन बाल एकांकिकांचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बहुजन रंगभूमीने ३० वर्षे पूर्ण केले. त्या निमित्ताने आयोजित बालनाट्य महोत्सव रविवारी लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात रसिकांच्या प्रतिसादात पार पडला. या नाट्यमहोत्सवात चिमुकल्या रंगकर्मींनी आपल्या नाट्याभिव्यक्तीच्या विविध तऱ्हा सादर करत रसिकांना भावविभोर केले.

बहुजन रंगभूमीच्या वतीने द्विदिवसीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले होते. पहिल्या व दुसऱ्या दिवशी नाट्य चळवळविषयक प्रबोधनात्मक मार्गदर्शन व नाट्यशिबिर ऊरुवेला कॉलनी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात पार पडले. त्यानंतर, रविवारी संध्याकाळी सायंटिफिक सभागृहात तिन बाल एकांकिकांचे सादरीकरण झाले. या तीनही एकांकिका बहुजन रंगभूमीचे विरेंद्र गणवीर यांनी लिहिल्या आहेत. बहुजन रंगभूमीच्या वतीने सादर झालेल्या सुरेंद्र वानखेडे दिग्दर्शित ‘थेंब थेंब श्वास’ या नाटकात देव नन्नावेर, अनया शिंपी, ईश्वरी गोडबोले, दीपांशी मुरमाडे, कौशिक गणेशे या बालकांच्या भूमिका होत्या, तर अस्मिता पाटील यांचे सह दिग्दर्शन होते. नेपथ्य उत्कर्ष तायडे, प्रकाशयोजना रिशिल ढोबळे, पार्श्वसंगीत रोहित लोखंडे, रंगभूषा निखिल कोसेकर, वेशभूषा हिमांशू वहाणे यांची होती. रंगमंच व्यवस्था ॲलेन नाखले व श्रेयस शेंद्रे यांची होती. दी बुद्धिस्ट ऑर्ट थिएटर ऑफ इंडियाच्या वतीने सादर झालेल्या रिशिल ढोबळे दिग्दर्शित ‘घायाळ पाखरा’मध्ये ओम राऊत, अनुष्का शेंडे, श्लोक पारवे, जिशांत मुरमाडे या बालकांच्या भूमिका होत्या. नेपथ्य शिवम मस्के, प्रकाशयोजना रितिक भगत, रंगभूषा यतिश वैद्य व वेशभूषा समुद्र रायपुरे यांची होती. निखिल दांडेकर, अमिता शंभरकर व स्तवन गवारे यांनी रंगमंच व्यवस्था सांभाळली. अश्वघोष कला अकादमीच्या वतीने सादर झालेल्या आशिष दुर्गे दिग्दर्शित ‘आम्हालाही पंख हवेत’मध्ये कौशिक गणेशे, पुण्या लारोकर, उन्नती गव्हाणे, पार्थ पवार, मुजफ्फर अहमद या बालकांच्या भूमिका होत्या. नेपथ्य अभिनय जपुलकर, प्रकाशयोजना किशोर बत्तासे, पार्श्वसंगीत रोहित लोखंडे, रंगभूषा डिंपल पाटील, वेशभूषा श्रद्धेय तारेकर यांची होती. भूषण मेश्राम व लक्की भरतवाडे यांनी रंगमंच व्यवस्था सांभाळली.

............