योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून बऱ्याच तरुणांना ऑनलाइन गेम खेळण्याचे अक्षरशः व्यसन लागले आहे. अशाच एका तरुणाची 'ऑनलाइन सापशिडी' खेळण्याच्या नादात आयुष्यात कमावलेली ३७ लाखांची कमाई स्वाहा झाली. या प्रकरणात 'विंझो अॅप'च्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अॅपमध्ये शेवटच्या टप्प्यांत हरविण्यासाठी खेळणाऱ्यांना 'सेटिंग' असल्याची तक्रार तरुणाने केली आहे.
'गेम खेळा आणि पैसे जिंका' या मोहक जाहिरातीला भुलून अखिलेश नावाच्या तरुण व्यावसायिकाने १ मार्च २०२३ रोजी गूगल प्ले स्टोअरवरून 'विंझो-प्ले गेम्स अँड व्हिन रिअल कॅश' हे अॅप डाऊनलोड केले होते. त्यात मोबाईल क्रमांक टाकणे अनिवार्य होते व ओटीपी टाकल्यावरच लॉगिन होत होते. लॉगिन झाल्यावर 'गेमझोन' उघडायचा. गेम खेळण्यासाठी त्यात पैसे टाकणे आवश्यक होते. एखादे अकाऊंट रिचार्ज करण्याप्रमाणे संबंधित पैसे अॅपमध्ये दिसायचे व तेवढा वेळ गेम खेळता येत होते. तरुणाने २ हजार रुपये टाकून सुरुवात केली व केवळ वेळ घालविण्यासाठी खेळायला सुरुवात केली. गेममध्ये पैसे टाकल्यास अधिक मोठे गेम खेळता येतात आणि जिंकल्यास पैसे मिळतात, असा दावा अॅपमध्ये केला जात होता. सुरुवातीला काही वेळा जिंकल्याचा अनुभव मिळाल्याने अखिलेशचा आत्मविश्वास वाढला. आपल्या कौशल्यावर आपण जिंकू शकतो," अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली. परंतु नंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली. प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी गेम हातातून निसटत गेला आणि पैसे गमवावे लागले. जिंकलेले पैसे परत मिळतील, या आशेने त्याने पुन्हा पुन्हा पैसे टाकले. त्याने डिसेंबर २०२५ पर्यंत अॅपमध्ये ३७ लाख १२ हजार रुपये गमावले. त्याच्या तक्रारीवरून विंझो अॅप, अॅपचे मालक पवन नंदा व सौम्या सिंग राठोड यांच्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.
'ड्रॅगन लेव्हल'ने केला घात
अखिलेशला ऑनलाइन सापशिडी खेळता खेळता अतिआत्मविश्वास झाला व डायस फिरत असताना ६ ते ८ सेकंदात विशिष्ट पद्धतीने क्लिक केल्यावर मोठा आकडा येतो, असे त्याला जाणवले. त्यातच खेळता खेळता तो सर्वात वरच्या 'ड्रॅगन लेव्हल'वर पोहोचला. आता आपण मोठी रक्कम एकहाती जिंकू शकू या अतिआत्मविश्वासातून त्याने जास्त पैसे लावले आणि त्यातच त्याचा घात झाला. काही काळाने अॅप अचानक बंद झाले आणि खात्यातील व्यवहारही दिसेनासे झाले.
Web Summary : A Nagpur man lost ₹37 lakhs playing online Snakes and Ladders on the Winzo app. He alleges the app is rigged to make players lose at the last moment. Police have filed a case against the app owners.
Web Summary : नागपुर के एक शख्स ने विंजो ऐप पर ऑनलाइन सांप सीढ़ी खेलते हुए ₹37 लाख गंवा दिए। उन्होंने आरोप लगाया कि ऐप आखिरी समय में खिलाड़ियों को हराने के लिए फिक्स है। पुलिस ने ऐप मालिकों के खिलाफ मामला दर्ज किया है।