शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
5
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
6
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
7
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
8
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
9
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
10
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
11
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
12
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
13
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
14
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
15
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
16
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
17
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
18
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
19
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
20
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक

सहा स्कूलबससह व्हॅन जप्त

By admin | Updated: July 14, 2015 02:55 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल बससाठी नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. याच्या अंमलबजावणीला तीन

नागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल बससाठी नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. याच्या अंमलबजावणीला तीन वर्षे होत असतानाही अनेक शाळा नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने सोमवारी स्कूल बस व व्हॅनची तपासणी केली असता दोन स्कूल बस व चार स्कूल व्हॅनमधील वेग नियंत्रक नादुरुस्त असल्याचे दिसून आले. याशिवाय मीटरने न चालणाऱ्या ११ आॅटोरिक्षाही जप्त केल्या.विद्यार्थी वाहतुकीला संवेदनशील वाहतूक म्हणून ओळखले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक करणाऱ्या स्कूल बस व व्हॅनसाठी विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली आहे. यात भरधाव स्कूल बस व व्हॅनला मर्यादा पडाव्यात म्हणून शासनाने महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या स्कूल बसचा वेग ४० तर हद्दीच्या बाहेर ५० किलोमीटर प्रति तासापेक्षा वेग नसावा, यासाठी बसमध्ये वेगमर्यादा नियंत्रक (स्पीड गव्हर्र्नर) बसविण्याचे निर्देश दिले. परंतु अनेक वाहनचालक पैशाच्या हव्यासापोटी जास्तीतजास्त फेऱ्या होण्याच्या दृष्टीने स्पीड गव्हर्नर तोडतात. ‘लोकमत’ने हा प्रकार नुकताच उघडकीस आणला. याची दखल आरटीओ शहर कार्यालयाने घेऊन स्कूल बस व व्हॅन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी कळमेश्वर रोडवर वाहनांची तपासणी केली असता दोन स्कूल बस व चार व्हॅनमधील स्पीड गव्हर्नर तोडलेले आढळून आले. ही वाहने जप्त केली आहेत. आॅटोरिक्षा मीटरने चालत नसल्याच्या आरटीओकडे तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत १५ आॅटोंना कारणे दाखवा नोटीस देऊन यातील ११ आॅटो जप्त केल्या आहेत. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली.(प्रतिनिधी)