शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

जारी झाले पहिले अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 12:20 IST

अमरावती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केशव सोनेने या व्यक्तीला नुकतेच गोवारी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे वैधता प्रमाणपत्र जारी केले आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयाला ही माहिती दिली.

ठळक मुद्देहायकोर्टात सरकारची माहितीऐतिहासिक निर्णयाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोवारी ही जात अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये मोडते असा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी १४ आॅगस्ट २०१८ रोजी दिला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अमरावती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केशव सोनेने या व्यक्तीला नुकतेच गोवारी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे वैधता प्रमाणपत्र जारी केले आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयाला ही माहिती दिली.पडताळणी समितीने सुरुवातीला सोनेने यांचा गोवारी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा दावा फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी २००७ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर काही संघटनांनी गोवारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे लाभ मिळण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केल्या. १४ आॅगस्ट २०१८ रोजी न्यायालयाने त्या सर्व याचिका निकाली काढून वरील ऐतिहासिक निर्णय दिला. त्यावेळी न्यायालयाने सोनेने यांच्या दाव्यावर सहा आठवड्यात नव्याने निर्णय घेण्याचा आदेश पडताळणी समितीला दिला होता.त्यानुसार समितीने नव्याने निर्णय घेऊन सोनेने यांचा दावा मंजूर केला. अनुसूचित जमाती प्रवर्गाचे लाभ मिळावे याकरिता गोवारी समाज २३ वर्षांपासून संघर्ष करीत होता. न्यायालयाच्या सकारात्मक निर्णयामुळे स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांचा लढा यशस्वी ठरला. महाराष्ट्रामध्ये गोंड-गोवारी अशी स्वतंत्र जमात अस्तित्वात नाही. गोंड-गोवारी संबोधले जात असलेले सर्वजण गोवारी आहेत.गोंड-गोवारी ही गोंड जमातीची उपजमातही नाही. गोंड व गोवारी या दोन भिन्न जमाती आहेत. गोंडाप्रमाणे गोवारीदेखील आदिवासीच आहेत. त्यामुळे गोवारींना अनुसूचित जमातीचे लाभ नाकारले जाऊ शकत नाही असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या ऐतिहासिक निर्णयात नोंदविले आहे.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना