शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
9
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
10
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
11
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
12
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
13
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
14
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
15
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
16
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
17
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
18
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
19
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
20
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

सामाजिक उपक्रमांचा 'व्हॅलेंटाईन डे': बहरला प्रेमाचा वसंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 22:22 IST

‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणणाऱ्या प्रेमवीरांनी आपल्या हक्काचा दिवस साजरा केलाच. फक्त फरक हा होता की भेटण्याची जागा बदलली होती, प्रेम व्यक्त करण्यात नियंत्रितपणा होता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक जबाबादारीचे भान राखत तरुणाईने प्रेमाचा वसंत फुलविला.

ठळक मुद्देशहरात कडक पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हटला की जिवलगाला भेटण्याची ओढ ही आलीच. घरातून उपस्थित होणारे प्रश्न, लोकांच्या भिरभिरत्या नजरा चुकवत ‘कुछ भी हो’ पण एका क्षणासाठी भेटण्याची धडपड. सोबतीला जागोजागी असलेला बंदोबस्त अन् प्रेमदिवसाला विरोध करणाऱ्या संघटनांचा विरोध. या सर्व वातावरणात ‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणणाऱ्या प्रेमवीरांनी आपल्या हक्काचा दिवस साजरा केलाच. फक्त फरक हा होता की भेटण्याची जागा बदलली होती, प्रेम व्यक्त करण्यात नियंत्रितपणा होता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक जबाबादारीचे भान राखत तरुणाईने प्रेमाचा वसंत फुलविला.

प्रेमाच्या बाबतीत ‘हुश्शार’ झालेल्या ‘यंगिस्तान’ने शुक्रवारी भेटण्याचे कट्टेच बदलवले. कोणी शॉपिंग मॉलकडे मोर्चा वळविला तर कोणी आवडत्या ‘रेस्टॉरेन्ट’कडे धाव घेतली. अनेकांनी नाहक मनस्ताप टाळण्यासाठी मोबाईल, फेसबुक व ‘स्काईप’चा आधार घेतला. अनेक जण तर अशा प्रकारे भेटले की इतरांना ते अनोळखीच वाटावे, पण नजरांतूनच प्रेमाची देवाणघेवाण झाली. केवळ प्रेमीयुगुलच नव्हे तर तरुणांच्या ग्रुप्सनेदेखील धमाल केली. कोणी एखाद्या ‘पार्क’जवळ बसून निवांत चर्चा केली, तर कुणी बजाजनगरजवळ आपला कट्टा उभारला.यंदा गालबोट नाहीजुने अनुभव लक्षात घेता शहरातील उद्याने ओस पडली होती. बजरंग दलाने रॅली काढली. कशाला हवी नसती भानगड असा विचार करून तरुणाईने सार्वजनिक स्थळांवर जाऊन ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचा बेत रद्द केला. सायंकाळच्या सुमारास शहरातील तरुणाईच्या कट्ट्यांवर गर्दी व्हायला सुरुवात झाली.फुटाळ्यावर तरुणांचे रक्तदानफुटाळा तलावावर फक्त तरुणाईची सामाजिक संवेदना पहायला मिळाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिबिरात अनेक तरुण-तरुणींनी पुढाकार घेत रक्तदान केले. सकाळपासून सुरू झालेले हे शिबिर सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते व तरुणांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे वैद्यकीय विद्यार्थ्यांनीदेखील रक्तदानासोबत विविध सामाजिक मुद्द्यांवर जनजागृती केली. पथनाट्येदेखील सादर केली.बदललेले कट्टेदररोज रस्त्याच्या दुतर्फा आपले वाहन उभे करून गप्पा मारणाऱ्या तरुणाईने आज आपले कट्टे बदलवले होते. एरवी सेमिनरी हिल्स, लेडीज क्लब, अमरावती मार्ग या परिसरातील रस्त्यांच्या कडेला दिसणारे प्रेमीयुगुल व तरुणांचे ग्रुप सिव्हिल लाईन्स, लक्ष्मीनगर, महाराजबाग, वर्धा रोड, आरपीटीएस, आयटी पार्क, शिवाजीनगर येथील शांत रस्त्यावर दिसून येत होते.कडेकोट पोलीस बंदोबस्तहिंगणघाट येथील तरुण प्राध्यापिकेला जाळण्याची घटना तसेच गुरुवारीच सावनेरमध्ये एका डॉक्टरवर अ‍ॅसिड फेकण्याची घटना ताजीच होती. ‘व्हॅलेंटाईन डे’ दरम्यान कुठलीही अनुचित घटना होऊ नये, अशाप्रकारे कुठलीही घटना होऊ नये याची पोलीस प्रशासनाने काळजी घेतली होती. फुटाळा, महाराज बाग, ट्रॅफिक पार्क, सेमिनरी हिल्स या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेnagpurनागपूर