शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा दर्शन कॉलनीतच होणार; हायकोर्टाचा स्थगितीस नकार

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 13, 2023 18:09 IST

Nagpur News महाविकास आघाडीची बहुचर्चित वज्रमूठ सभा पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावरच होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता या सभेला स्थगिती देण्यास नकार दिला.

राकेश घानोडेनागपूर : महाविकास आघाडीची बहुचर्चित वज्रमूठ सभा पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावरच होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता या सभेला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, परवानगीची वैधता, अटींचे पालन इत्यादी उर्वरित मुद्दे विचारात घेण्यासाठी प्रकरणावर २४ एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.

ही सभा येत्या रविवारी होणार आहे. त्याविरुद्ध धीरज शर्मा, अमोल आखरे व गजानन देवतळे या तीन स्थानिक नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व महेंद्र चांदवाणी यांनी ऐकली. दरम्यान, सभेला स्थगिती देण्यासाठी आवश्यक बाबी न्यायालयाला आढळून आल्या नाही. या सभेला परवानगी मिळविण्यासाठी महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे (काँग्रेस) यांनी नागपूर सुधार प्रन्यासला अर्ज सादर केला होता. नासुप्रने गेल्या ३१ मार्च रोजी तो अर्ज मंजूर करून सभेला विविध अटींसह परवानगी दिली. त्यामुळे या याचिकेत तानाजी वनवे यांना प्रतिवादी करणे बंधनकारक होते. परंतु, याचिकाकर्त्यांनी केवळ जिल्हाधिकारी, नासुप्र सभापती, पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांनाच प्रतिवादी केले. परिणामी, न्यायालयाने याचिकाकर्त्यांना वनवे यांनाही प्रतिवादी करण्यास सांगून त्यांना नोटीस बजावली आणि या याचिकेवर वनवेसह इतर प्रतिवादींनी पुढील सुनावणीपर्यंत उत्तर सादर करावे, असे निर्देश दिले.

असे होते याचिकाकर्त्यांचे आक्षेपसभेला सुमारे ५० हजार कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी परिसरात खाद्यान्न व पाण्याचे स्टॉल लावले जातील. त्यातून सर्वत्र कचरा होईल. हे मैदान घनदाट वस्तीमध्ये आहे. करिता, स्थानिक नागरिकांकरिता ही सभा गैरसोयीची ठरेल. सभेमध्ये लाऊडस्पीकरचा उपयोग केला जाईल. त्याचा विद्यार्थ्यांचा अभ्यास व परिसरातील रुग्णालयांमधील रुग्णांवर वाईट परिणाम होईल. सभेविरुद्ध नागरिकांनी आंदोलने केली होती. असे असतानाही नासुप्रने सभेला बेकायदेशीरपणे परवानगी दिली, इत्यादी आक्षेप याचिकाकर्त्यांनी घेतले होते.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी