शासकीय रुग्णालये व महापालिका रुग्णालयात लसीकरण सुरू होते. मात्र नागरिकांना सुविधा व्हावी, यासाठी महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी गाजावाजा करून सर्व दहा झोनमध्ये ७८ लसीकरण केंद्र सुरू केले. दोन दिवस लस मिळाली. रविवारी यातील बहुसंख्य केंद्रावर लस नव्हती. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे लस उपलब्ध आहे की नाही, ती कधी येणार याची माहिती कुणीही देत नव्हते. महापालिकेचे अधिकारी मोबाईलवर प्रतिसाद देत नसल्याने लसीकरणाचा गोंधळ आणखी वाढला.
...
व्यवस्था कोलमडली, शासनाने हस्तक्षेप करावा
कोरोना चाचणी व लसीकरणाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत. महापालिका प्रशासन हतबल दिसत आहे. लस ठेवण्याची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी साठा केला जातो. रविवारी बहुसंख्य केंद्रावर लस नव्हती. शासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास नागपूर शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाईल. पालकमंत्र्यांनी तत्काळ बैठक घेऊन निर्देश द्यावेत.
तानाजी वनवे, विरोधी पक्षनेता, महापालिका