शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम शेवडे बसपातून निलंबित : बसपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:02 IST

बहुजन समाज पार्टी (बसपा) तील जुन्या वरिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये गणले जाणारे आणि बसपाचे मीडिया प्रभारी अशीच ज्यांची ओळख असलेले उत्तम शेवडे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआरोप-प्रत्यारोपाचे सत्र कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुजन समाज पार्टी (बसपा) तील जुन्या वरिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये गणले जाणारे आणि बसपाचे मीडिया प्रभारी अशीच ज्यांची ओळख असलेले उत्तम शेवडे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे बसपात अजूनही सर्व काही व्यवस्थित नसल्याचे दिसून येते.बसपातर्फे जिल्हा प्रभारी नागोराव जयकर यांच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, बसपाचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांच्या आदेशानुसार शुक्रवारी १० जानेवारी रोजी उत्तम शेवडे यांना पक्षविरोधी कृत्य केल्याबद्दल पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे. यामध्ये शेवडे यांना स्वयंघोषित मीडिया प्रभारी असेही म्हटले आहे.मागील काही वर्षात बसपात ऐन निवडणुकीनंतर पक्षात मोठे वादळ होत असल्याच्या घटना नागपूर व विदर्भात सातत्याने होत आहेत. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या लोकसभा उमेदवारालाच निलंबित करण्यात आले. त्याने प्रदेश स्तरावरील ज्येष्ठ नेत्यांवर आर्थिक देवणघेवाणीचे आरोप केले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर खुद्द प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांना निलंबित करण्यात आले. त्यांनीच असेच काहिसे आरोप केले होते. तसेच सत्र पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येते. उत्तम शेवडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या जि.प. निवडणुकीच्या निकालानंतर केलेले वक्तव्य त्यांच्यासाठी नुकसानदायक ठरले आहे.पक्षविरोधी कृत्यामुळे शेवडे यांना पक्षातून काढलेजि.प. निवडणूक न लढण्याचा निर्णय हा पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचा होता. त्यांच्या आदेशानुसारच पक्षाने काम केले. असे असताना त्यासंदर्भात वक्तव्य करण्याचा शेवडे यांना काहीही अधिकार नव्हता. ते कुठल्याही पदावर नाहीत. ते स्वयंघोषित मीडिया प्रभारी म्हणून मिरवतात. असे असतानाही त्यांनी काँग्रेसला फायदा पोहोचवण्यासाठी बसपा निवडणुक लढवली नसल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. हे वक्तव्य म्हणजे पक्षाविरुद्ध केलेले कृत्य असून असे कृत्य खपवले जाणार नाही. त्यामुळेच त्यांना निलंबित करण्यात आले.संदीप ताजनेप्रदेशाध्यक्ष, बसपानियुक्ती पत्रासाठी मागितले एक लाख रुपयेमी कुठलेही पक्षविरोधी कृत्य केलेले नाही. बसपा निवडणुकीत नसल्याने काँग्रेसला फायदा झाला, इतकेच बोललो. ते चुकीचे नाही. खरी बाब अशी आहे की, राज्यातील व नागपुरातील पक्षाची नव्यानेच कार्यकारिणी गठित झाली आहे. प्रदेशाध्यक्ष ताजने हे नुकतेच नागपूर दौऱ्यावर येऊन गेले. त्यावेळी त्यांनी मला मीडिया प्रभारी घोषित केले होते. त्यानुसार मी कामही पाहत होतो. परंतु नियुक्ती पत्रासाठी प्रदेशाध्यक्ष ताजने यांनी मला एक लाख रूपयाची मागणी केली. मी ती देण्यास नकार दिला म्हणून माझ्यावर ही कारवाई करण्यात आली.उत्तम शेवडे

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीsuspensionनिलंबन