शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मेडिकलमध्ये गर्भाशय प्रत्यारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:18 IST

वैद्यकीयदृष्ट्या अवघड व गुतांगुतीची गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या मंजुरीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या परवानगीनंतर या शस्त्रक्रियेला सुरुवात होईल. साधारण येत्या दोन महिन्याच्या आत गर्भाशय प्रत्यारोपण केले जाईल, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देअधिष्ठाता निसवाडे यांचा पुढाकारअवयवदाता व अवयव स्वीकारणारा रुग्ण तयार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीयदृष्ट्या अवघड व गुतांगुतीची गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या मंजुरीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या परवानगीनंतर या शस्त्रक्रियेला सुरुवात होईल. साधारण येत्या दोन महिन्याच्या आत गर्भाशय प्रत्यारोपण केले जाईल, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘लोकमत’ला दिली.नेत्र, मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपणानंतर आता नागपुरात लवकरच गर्भाशयाचे प्रत्यारोपण होणार आहे. हे प्रत्यारोपण देशातील शासकीय रुग्णालयात पहिले ठरणार आहे. या शस्त्रक्रियेमुळे मातृत्वाच्या हक्कापासून वंचित राहणाऱ्या महिलांना मातृत्वसुखाची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, डॉ. निसवाडे यांच्या पुढाकारामुळेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाला सुरुवात झाली. राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे हे पहिले हॉस्पिटल ठरले आहे.डॉ. निसवाडे यांनी सांगितले, स्वीडन, अमेरिकेनंतर आता भारतात गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी होत आहे. त्यामुळे गर्भाशय प्रत्यारोपणाला आता विशेष महत्त्व आले आहे. प्रत्यारोपणाकरिता लागणारी आवश्यक परवानगीचा प्रस्ताव शुक्रवारी आरोग्य खात्याकडे पाठविली जाणार आहे. याची पूर्वकल्पना आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. त्यांनीही तातडीने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. गर्भाशय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. शैलेश पुणतांबेकर ही शस्त्रक्रिया करणार आहेत. मेडिकलमध्ये दोन गर्भाशयदाता आणि ते स्वीकारणाºया महिला रुग्णाची नोंदही झाली आहे. शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे. गर्भाशय हे ‘ब्रेन डेड’ म्हणजे, मेंदू मृत किंवा जिवंत महिलांकडून दान करता येऊ शकते.मातृत्वाच्या प्रतीक्षेत महिलांसाठी आशेचा किरणगर्भाशयाच्या प्रत्यारोपणामुळे मातृत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो महिलांना नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. गर्भाशय प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. भारतात पहिली शस्त्रक्रिया दुर्बिणीचा वापर करून झाली. गर्भाशय प्रत्यारोपणामुळे स्वत:च्या पोटात मूल वाढविणे महिलेस शक्य झाले आहे. तसेच रक्ताच्या नात्यातील दात्यालाच गर्भाशयाचे दान करणे वैद्यकीयदृष्ट्या शक्य असल्यामुळे या दानाचा बाजार होण्याचीही शक्यता कमी आहे. आता हे तंत्रज्ञान नागपूर मेडिकलसारख्या शासकीय रुग्णालयात होणार असल्याने त्याचा खर्चही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार असून त्याचा खरा उपयोग होईल.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयOrgan donationअवयव दान