शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धनादेशाचा गैरवापर करून पावणेदोन लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:15 IST

एका नोकरदार तरुणाचे सीमकार्ड ब्लॉक करून आरोपीने त्याच्या नावाने चेकबुक मिळवले. त्यानंतर चेकवर बनावट सही करून १ लाख ७० हजार रुपये लंपास केले. सोमवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, हार्दिक शैलेष खारा (वय ३१) नामक फसगत झालेल्या तरुणाने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

ठळक मुद्देसीम ब्लॉक करून मिळवले चेकबुक : नंतर काढली रक्कम, सीताबर्डीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका नोकरदार तरुणाचे सीमकार्ड ब्लॉक करून आरोपीने त्याच्या नावाने चेकबुक मिळवले. त्यानंतर चेकवर बनावट सही करून १ लाख ७० हजार रुपये लंपास केले. सोमवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, हार्दिक शैलेष खारा (वय ३१) नामक फसगत झालेल्या तरुणाने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.खारा एका गॅस कंपनीत कार्यरत आहेत. ते रामदासपेठमध्ये राहतात. आयसीआयसीआय बँकेत त्यांचे खाते असून, काही दिवसांपूर्वी अचानक त्यांचे सीमकार्ड ब्लॉक झाले. सोमवारी त्यांनी आपले सीमकार्ड बदलवून सुरू करून घेतले. तेव्हा त्यांना त्यांच्या खात्यातून १ लाख ७० हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यांनी बँकेकडे विचारणा केली असता, त्यांच्या नावाचे नवीन चेकबुक बँकेतून दुसऱ्याच कुणीतरी काढून घेतले आणि चेकवर बनावट स्वाक्षरी करून १ लाख ७० हजार रुपये काढून घेतल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी दुपारी ४ वाजता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर खारा यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.विशेष म्हणजे, एखाद्याचा मोबाईल क्रमांक मिळवून कंपनीला फोन करणे, माझा मोबाईल हरविला अशी थाप मारून तो मोबाईल नंबर कंपनीतर्फे ब्लॉक करून घेणे, त्यानंतर बँकेतून चेकबुक मिळविणे आणि बनावट स्वाक्षरी करून चक्क पावणेदोन लाखांची रक्कम विड्रॉल करण्याचा हा घटनाक्रम पोलिसांनाही चक्रावून टाकणारा ठरला आहे. एखाद्या ग्राहकाच्या खात्याचे चेकबुक शहानिशा न करता दुसऱ्या व्यक्तीकडे दिलेच कसे गेले, हा पहिला प्रश्न असून, चेकबुक दिल्यानंतर मोठी रक्कम विड्रॉल करताना सही त्याच व्यक्तीची आहे की नाही, याचीही शहानिशा बँक अधिकाऱ्यांकडून न होणे, हा प्रकारच गंभीर आहे. विशेष म्हणजे, आरोपीने ही रक्कम चंद्रपुरातील एका बँकेतून काढली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी