शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

सर्किट ब्रेकरचे सुरक्षा कवच वापरा, विद्युत अपघाताचे धोके टाळा

By आनंद डेकाटे | Updated: July 4, 2024 16:49 IST

Nagpur : महावितरणचे नागरिकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्यात घर, दुकान, सोसायट्या, इलेक्ट्रिक वाहन व इतर उपकरणांमधील अंतर्गत वायरिंग, विविध उपकरणे किंवा लोखंडी साहित्यांतून विद्युत प्रवाहाचा धक्का बसून अपघात होत असतात. यासाठी प्रामुख्याने ग्राहकांकडील अंतर्गत वायरिंगमधील करंट लिकेज किंवा योग्य क्षमतेचे सर्किट ब्रेकर, अर्थिंग नसणे कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून घर किंवा इतर वास्तूंमध्ये सर्किट ब्रेकर लावण्यात यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सर्किट ब्रेकर हे एक विद्युत सुरक्षा उपकरण आहे जो इलेक्ट्रिकल सर्किटला ओव्हरकरंट,ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किटमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. संरक्षणात्मक रिलेने दोष शोधल्यानंतर विद्युत प्रवाहात व्यत्यय आणणे हे त्याचे मूळ कार्य आहे. वीजसंच मांडणीमध्ये विजेचा धोका टाळण्यासाठी योग्य अर्थिंग अत्यावश्यक आहे. घरगुती किंवा इतर आस्थापनांमधील अंतर्गत वीजयंत्रणेत बिघाड झाल्यास आणि वीजपुरवठा खंडित न होता सुरू राहिल्यास अपघात होतात. असे झाल्यास वीजपुरवठा तत्काळ खंडित होणे आवश्यक आहे. यासाठी घर, सोसायट्या किंवा इतर वास्तुंमध्ये सर्किट ब्रेकर जसे की अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (इएलसीबी), रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर (आरसीसीबी), मिनिएच्युअर सर्किट ब्रेकर (एमसीबी) लावणे अत्यावश्यक आहे. अंतर्गत वायरिंग किंवा उपकरणांमधील दोषामुळे सर्किट ब्रेकर म्हणजे विद्युत अपघात टाळणारे प्राथमिक व महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे.

विद्युत अपघात टाळण्यासाठी अर्थिग योग्य स्थितीत असल्याची किमान दर दोन वर्षांनी खात्री करून घ्यावी. नवीन वास्तू बांधताना प्रामुख्याने अर्थिगसह सर्किट ब्रेकर लावणे अनिवार्य आहे. मात्र, जुन्या वास्तूमध्ये ते नसल्यास तत्काळ लावावे, असेही महावितरणकडून सांगण्यात आले. दिवसेंदिवस वीजेची वाढती मागणी आणि बीज यंत्रणेचा होणारा विस्तार बघता सर्किट ब्रेकरचे महत्व देखील वाढले आहे.

अशी घ्या काळजीबाजारात सुमारे २० ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध असणाऱ्या विद्युत टेस्टरमुळे वीज अपघाताचे धोके टाळता येतात. ओल आलेल्या भिंतीला, टिनपत्र्याला, कपडे वाळत घालायच्या लोखंडी तारेला, फ्रीज, टिव्ही, संगणक, गिझर किंवा पाण्याचे नळ, कुलर आर्दीना हात लावल्यावर झिणझिण्या येत असतील, तसेच ओलसर लोखंडी पाइप, कृषिपंपाची पेटी, पाण्याच्या मोटार पंपांला स्पर्श करण्यापूर्वी विद्युत टेस्टरने त्याची तपासणी करावी. पायात रबरी किंवा प्लॅस्टिक चप्पल वापरावी, असेही महावितरणने कळविले आहे.

टॅग्स :electricityवीजAccidentअपघातnagpurनागपूर