शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बँकांमध्ये सॅनिटायझरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 11:21 IST

कोरोना विषाणूचा प्रभाव पाहता बँकांच्या सर्व शाखांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर ठेवण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावर देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देबँक ऑफ महाराष्ट्रमध्ये स्वतंत्र व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा प्रभाव पाहता बँकांच्या सर्व शाखांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर ठेवण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावर देण्यात आले आहेत. त्यानुसार आता राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या प्रत्येक शाखांमध्ये बायोमेट्रिक मशीनजवळील सॅनिटायझरचा उपयोग कर्मचारी करीत असल्याचे दिसून येत आहे.बँक ऑफ इंडियाच्या नागपूर झोनचे झोनल व्यवस्थापक विलास पराते म्हणाले, नागपूर विभागांतर्गत १०७ शाखा कार्यरत आहेत. सर्व शाखांच्या व्यवस्थापकांना बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर आणि स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले आहे.त्यानुसार सर्वच व्यवस्थापकांनी व्यवस्था केली आहे, तसेच खासगी एजन्सीतर्फे संचालित सर्वच एटीएममध्ये सॅनिटायझर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक मनोज करे म्हणाले, बँकेच्या प्रत्येक शाखेत कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बायोमेट्रिक व्यवस्था आहे. कर्मचाºयाने मस्टरवर सही केल्यानंतर त्याला आपला कॉम्प्युटर बायोमेट्रिकने सुरू करायचा आहे.‘एटीएम’मध्ये सॅनिटायझर नाहीराष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांनी एटीएमचे संचालन व सुरक्षा खासगी एजन्सीकडे दिली आहे. त्यांना संबंधित बँकांनी कोरोना विषाणूच्या धोका ओळखून एटीएममध्ये पैसे काढणाऱ्या ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवून एटीएम परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पण संचालन करणाऱ्या कंपनीतर्फे अधिकाऱ्यांचे पालन केल्याचे दिसून येत नाही. कोणत्याही एटीएममध्ये स्वच्छता वा ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवण्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूसंदर्भात संपूर्ण देशात सतर्कता बाळण्यात येत असताना एजन्सीने ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्राहकांची मागणी आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस