शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कापडासह कागद व ज्यूटच्या पिशव्यांचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 11:40 IST

प्लास्टिक बॅग व पॉलिथीनवर बॅन आणल्यानंतर नागपुरातील विविध भाजी बाजारात, मॉल्समध्ये कापड, ज्यूट व कागदाची पिशवी नि:शुल्क देत आहे. त्यासाठी भाजी विक्रेत्याकडून ठोकमध्ये भाजी खरेदी करावी लागणार आहे.

ठळक मुद्देठोक भाजी घेतल्यास पिशवी नि:शुल्कप्लास्टिक बंदीचा प्रभाव जाणवू लागला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लास्टिक बॅग व पॉलिथीनवर बॅन आणल्यानंतर नागपुरातील विविध भाजी बाजारात, मॉल्समध्ये कापड, ज्यूट व कागदाची पिशवी नि:शुल्क देत आहे. त्यासाठी भाजी विक्रेत्याकडून ठोकमध्ये भाजी खरेदी करावी लागणार आहे.चिल्लरमध्ये जर भाजी घेतली तर ५ ते १० रुपये पिशवीसाठी द्यावे लागतील. काही भाजी विक्रेते तर ग्राहकांकडून पिशवीचे १० रुपये घेत आहे. दुसऱ्या दिवशी ग्राहकांनी पिशवी परत केल्यास पैसेही परत देत आहे. अशा पद्धतीने भाजी विक्रेत्यांनी आपापल्या स्तरावर पॉलिथीनचा पर्याय शोधला आहे. काही विक्रेते कागद गुंडाळून भाजी देत आहे, तर काही फळ विक्रेते जूटच्या पिशवीत फळ देत आहे.भाजी विक्रेता शामबाबू म्हणाले की, जेव्हापासून प्लॅस्टीक बॅन झाले आहे तेव्हापासून कापडाच्या पिशवीचा वापर मी करीत आहे. ठोकमध्ये भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पिशवी नि:शुल्क देत आहे. जर ग्राहक एक-दोन किलो भाजी खरेदी करीत असेल तर त्यांच्याकडून पिशवीचे ५ ते १० रुपये घेत आहे.चिल्लरमध्ये जर भाजी घेतली तर ५ ते १० रुपये पिशवीसाठी द्यावे लागतील. काही भाजी विक्रेते तर ग्राहकांकडून पिशवीचे १० रुपये घेत आहे. दुसऱ्या दिवशी ग्राहकांनी पिशवी परत केल्यास पैसेही परत देत आहे. अशा पद्धतीने भाजी विक्रेत्यांनी आपापल्या स्तरावर पॉलिथीनचा पर्याय शोधला आहे. काही विक्रेते कागद गुंडाळून भाजी देत आहे, तर काही फळ विक्रेते जूटच्या पिशवीत फळ देत आहे.भाजी विक्रेता शामबाबू म्हणाले की, जेव्हापासून प्लॅस्टीक बॅन झाले आहे तेव्हापासून कापडाच्या पिशवीचा वापर मी करीत आहे. ठोकमध्ये भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पिशवी नि:शुल्क देत आहे. जर ग्राहक एक-दोन किलो भाजी खरेदी करीत असेल तर त्यांच्याकडून पिशवीचे ५ ते १० रुपये घेत आहे.कागद व कापड पिशवीचा उपयोगसहकारनगर येथील भाजी विक्रेते अरुण शाहू म्हणाले की, प्लास्टिकवर बॅन लागल्यानंतर कागद व कापड पिशवीचा उपयोग करण्यात येत आहे. जे लोक ठोकमध्ये भाजी खरेदी करतात, त्यांना पिशवी नि:शुल्क देण्यात येत आहे. पिशवीच्या खरेदीत पैसे अधिक जात असले तरी, आमच्यासाठी पर्याय नाही. ग्राहकांकडे पिशवी नसल्यामुळे आमचेच नुकसान होत आहे. त्यामुळे हा पर्याय योग्य आहे.

पिशवी परत दिल्यास पैसे परतखामला भाजी बाजारात आलू-कांद्याचे विक्रेते सुजित शाह म्हणाले की, ग्राहकांजवळ पिशवी नसेल तर आम्ही त्यांना पिशवी उपलब्ध करून देतो. त्या मोबदल्यात त्यांच्याकडून दहा रुपये घेतो. दुसºया दिवशी जर ग्राहकाने पिशवी परत केली तर आम्ही १० रुपये परतही देतो. ग्राहकांनी जास्त खरेदी केल्यास त्यांना मोठी पिशवी नि:शुल्क देतो. अशाच प्रकारे अमरावती रोडवर एक भाजी विक्रेता ग्राहकांना भाजी खरेदी केल्यावर कापडाची पिशवी देतो. दुसºया दिवशी ग्राहकाने पिशवी परत केल्यास पैसेही परत देतो.

कागदाच्या डब्यामध्ये देतात फळखामला बाजारातील फळ विक्रेते आकाश खुबाळकर म्हणाले की, फळाचे वजन जास्त असल्याने कापडाची स्वस्त पिशवी फाटते. त्यामुळे ज्या कागदाच्या डब्यामध्ये फळ आणले जाते. त्याच डब्याचा वापर ग्राहकांना फळ देण्यासाठी करतो. ज्या ग्राहकाने जास्त फळ खरेदी केले त्याच्याकडून डब्याचे पैसेही घेत नाही.

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी