शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा  : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 22:53 IST

नागपूर विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. ही कामे आधुनिक तंत्राचा वापर करुन दर्जेदार व श्वाश्वत स्वरुपात करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी आढावा बैठकीत केल्या.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. ही कामे आधुनिक तंत्राचा वापर करुन दर्जेदार व श्वाश्वत स्वरुपात करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी आढावा बैठकीत केल्या.सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार सहायक मुख्य अभियंता एम. एस. बांधवकर, विशेष प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, अधीक्षक अभियंता व्ही. डी. सरदेशमुख यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.मुख्य अभियंता देबडवार यांनी विभागाचे संगणकीय सादरीकरण केले.रस्ते, इमारतीच्या बांधकामाची बरीच कामे राज्यभरात सुरु आहेत. नागपूर विभागातील कामांची संख्याही मोठी आहे. कनिष्ठ अभियंत्याच्या भरतीमुळे कामांना गती आली असल्याची माहिती यावेळी मुख्य अभियंत्यांनी दिली. रस्ते विकास योजनेतर्गत ३१ मार्च २०१९ पर्यंत ८९.५५ टक्के काम झाले असून याबाबत भरणे यांनी समाधान व्यक्त केले.विभागाच्या अखत्यारीतील नागपूर विभागीय प्रयोगशाळेला नॅशनल अक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टींग अ‍ॅण्ड कॅलीबरेशन लेबॉरेटरीज (एनएबीएल) चे प्रमाणपत्र मिळाल्याने विभागातील दक्षता व गुणनियंत्रण पथकाच्या कामासाठी डॉ. नितीन टोणगावकर यांचा सत्कार राज्यमंत्री भरणे यांनी यावेळी केला.वर्धा व चंद्रपूरच्या कामांचाही आढावावर्धा येथील सेवाग्राम विकास आराखडा व सैनिकी स्कूल चंद्रपूरच्या कामांची सद्यस्थिती भरणे यांनी घेतली. विभागातील एकूण ६२ विश्रामगृहाकरिता सोलर रुफटॉप करण्याचे नियोजित असून या माध्यमातून ऊर्जा बचत व ऊर्जा संवर्धनाचा चांगला प्रयत्न होत असल्याने या कामाला गती देण्याचे निर्देश राज्यमंत्री भरणे यांनी दिले.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागministerमंत्री