शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणीमध्ये होणार आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 11:14 IST

इंडियन ब्युरो आॅफ मॉईन्सचा (आयबीएम) ७१ वा स्थापना दिवस हा ‘खनिज दिवस’ म्हणून १ मार्चला नागपुरातील मुख्यालयात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देआयबीएमचा ७१ स्थापना दिन खनिज दिवस म्हणून साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडियन ब्युरो आॅफ मॉईन्सचा (आयबीएम) ७१ वा स्थापना दिवस हा ‘खनिज दिवस’ म्हणून १ मार्चला नागपुरातील मुख्यालयात साजरा करण्यात आला.मुख्य अतिथी म्हणून वेस्टर्न कोल फील्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र, विशेष अतिथी म्हणून मॉयलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम.पी. चौधरी आणि अध्यक्षस्थानी आयबीएमचे महानियंत्रक रंजन सहाय होते. देशात खाणींचे वातावरण तयार करण्यासाठी सेवा अर्पण करणाऱ्यांचे खनिज दिवसानिमित्त स्मरण करण्यात आले. यानिमित्ताने रक्तदान शिबिर आणि ‘खनिज मार्च’चे आयोजन करण्यात आले. यात आयबीएमसह सहयोगी संस्थांच्या सदस्यांनी उत्साहाने भाग घेतला.राजीव रंजन मिश्र यांनी आयबीएमची कार्यरत भूमिका आणि भारतीय खाण व खनिज क्षेत्रांच्या विकासाच्या दिशेने आयबीएमच्या योगदानाची माहिती दिली. वाळू उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी वेकोलिने पुढाकार घेतला आहे. तसेच कोळसा खाणीतील पाणी ‘कोल नीर’ या नावाने कमी दरात पिण्यासाठी उपयोगात आणण्यात येत आहे. फ्लाय अ‍ॅशपासून विटा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.रंजन सहाय यांनी आयबीएमच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या सकारात्मकरीत्या पार पाडाव्यात, असे आवाहन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व वरिष्ठ मार्गदर्शक, आयबीएमचे माजी अधिकारी, एम. मुखर्जी आणि आयबीएमचे माजी महानियंत्रक सी.एस. गुंडेवार यांचे आभार मानले. आयबीएमच्या खाणींमध्ये आधुनिक तंत्रज्ञानांचा उपयोग करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी आयबीएमचे मुख्य खाण नियंत्रक एस. टियू यांनी स्वागतपर भाषण तर खनिज अर्थशास्त्रज्ञ एम.यू. सिद्दीकी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आयबीएमचे मुख्य खनिज अर्थशास्त्रज्ञ डॉ. पी.के. जैन यांनी आभार मानले.

टॅग्स :Western Coal Fields Limited Nagpurवेस्टन कोल फिल्डस् लिमिटेड नागपूर