शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वीज अपघात टाळण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरा; हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:20 IST

आग लागणे, ब्रेकडाऊन होणे इत्यादी अपघात टाळण्यासाठी वीज वितरण व्यवस्थेत सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे चाचणीसाठी तीन महिन्यांचा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आग लागणे, ब्रेकडाऊन होणे इत्यादी अपघात टाळण्यासाठी वीज वितरण व्यवस्थेत सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे यासंदर्भात तीन महिन्यात तांत्रिक चाचणी पूर्ण करून आवश्यक दिशानिर्देश जारी करण्यात यावेत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी केंद्र सरकारला दिलेत.यासंदर्भात पद्मकुमार जैन यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्यात ‘सेंट्रल इलेक्ट्रिसिटी आॅथोरिटी (टेक्निकल स्टॅन्डर्डस् फॉर कन्स्ट्रक्शन आॅफ इलेक्ट्रिकल प्लॅन्स अ‍ॅन्ड इलेक्ट्रिक लाईन्स) रेग्युलेशन्स-२०१०’मधील तरतुदींचे काटेकोर पालन होत नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. पारेषण, वितरण व वीज उपकेंद्रात अधिनियमाने ठरवून दिलेल्या दर्जाचे ट्रान्सफार्मर्स व अन्य उपकरणे वापरली जात नाहीत. त्यामुळे आग लागणे व ब्रेकडाऊन होण्याच्या घटना घडतात. त्यात अनेकदा प्राणहानी व वित्तहानी होते. या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपकरणे खरेदी करतानाच त्यांचा दर्जा तपासला जाणे आवश्यक आहे. तसेच, उपकरणे नियमानुसार बसवली गेली पाहिजे आणि उपकरणाची नियमित देखभाल व सर्व्हिसिंग केली गेली पाहिजे. परंतु, या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे दूर्घटना घडतात असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. सरकारने आतापर्यंत घडलेल्या दुर्घटनांची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, चौकशीनंतर दोषपूर्ण वीज उपकरणे पुरविणाऱ्या विक्रेत्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :electricityवीज