शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मेपर्यंत आरोग्य विद्यापीठाचे कामकाज ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:33 IST

जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याच्या अनुषंगाने परीक्षाविषयक कामकाजात ऑनलाईन प्रणालीचा अंतर्भाव करून प्रात्यक्षिक परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठास पाठविण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता मे २०१९ पर्यंत शोधनिबंध, गुणपत्रिका, पदवी ‘ऑनलाईन’ पद्धतीने उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.

ठळक मुद्देकुलगुरू म्हैसेकर यांची ग्वाही : नागपूर विभागीय केंद्रासाठी जागेचा प्रस्ताव

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याच्या अनुषंगाने परीक्षाविषयक कामकाजात ऑनलाईन प्रणालीचा अंतर्भाव करून प्रात्यक्षिक परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठास पाठविण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता मे २०१९ पर्यंत शोधनिबंध, गुणपत्रिका, पदवी ‘ऑनलाईन’ पद्धतीने उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.सोमवारी विद्यापीठाच्या नागपूर मेडिकल येथील विभागीय केंद्राला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.डॉ. म्हैसेकर म्हणाले, विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रबंध ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतात व त्यांचे मूल्यांकनदेखील ऑनस्क्रीन पद्धतीने करण्यात येते. हे तंत्रज्ञान वापरणारे भारतातील हे एकमेव विद्यापीठ आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी इतरही बाबी ‘ऑनस्क्रीन’ करण्याच्या प्रयत्नात आहे.मेडिकलमध्ये जागा मिळण्यासाठी प्रयत्नविद्यापीठाच्या नागपूर विभागीय केंद्राची व्याप्ती वाढविण्यासाठी पूर्वी पाच एकर जागेचा शोध सुरू करण्यात आला होता. मिहान येथील जागा उपलब्ध होणार होती. परंतु येथून केंद्राचा कारभार चालविणे विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचे होणार असल्याने तूर्तास नकार दिला आहे. मेडिकलमध्येच या केंद्रासाठी जागा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचा नुकताच एक प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना पाठविण्यात आला आहे. सध्या आहे त्या जागेवरील केंद्रात आवश्यक मनुष्यबळ व फर्निचर उपलब्ध करून देण्यात आले आहे.फेब्रुवारी महिन्यापर्यंत पीजी विद्यार्थ्यांना गाईडमेडिकलमधील औषधवैद्यकशास्त्र विभागात (मेडिसीन) प्राध्यापकाची रिक्त असलेली जागा, एका सहयोगी प्राध्यापकाची बदली तर एका सहयोगी प्राध्यापकाच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाचे १४ विद्यार्थी मार्गदर्शका(गाईड)अभावी अडचणीत आले आहेत. यावर उपाय म्हणून मेडिकल प्रशासनाने सहयोगी प्राध्यापकांना शैक्षणिक पदोन्नती (अकॅडमिक प्रमोशन) देण्याचा प्रस्ताव वैद्यकीय सचिवांकडे पाठविला आहे. याबाबत बोलताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, यासंदर्भातील एक पत्र विद्यापीठालाही प्राप्त झाले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला गाईड मिळेल अशी सोय केली जाईल, अशी ग्वाही डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

टॅग्स :Medicalवैद्यकीयonlineऑनलाइन