लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार जणांनी शाळकरी मुलावर सात महिन्यांपासून वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याचे संतापजनक प्रकरण उघडकीस आले असून, यशोधरानगर पोलिसांनी या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पीडित मुलाने (वय १३) पालकांना आणि नंतर यशोधरानगर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बिनाकी मंगळवारी परिसरात राहणारा आरोपी बादल पदोडे (वय १९), विजू पदोडे (वय १८) तसेच १२ आणि १३ वर्षांची दोन मुले एकत्र खेळतात. ६ आॅगस्ट २०१८ ला असेच खेळत असताना आरोपी बादल आणि विजूने पीडित मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. ते अन्य दोन अल्पवयीन आरोपींनी बघितले. तेव्हापासून पीडित बालकाने घरून पैसे आणि दागिने आणावे म्हणून त्याच्यावर ते चौघे दबाव टाकत होते. नकार दिल्यास ते त्याच्यावर आलटून पालटून अत्याचार करायचे. आरोपींनी सोमवारी सकाळी १०.३० वाजता अशाच प्रकारे पीडित मुलाला घरातून दागिने आणि पैसे आणण्यास सांगितले. त्याने नकार दिला असता आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर जवळच्या शाळेतील बाथरूममध्ये नेऊन त्याच्यावर अत्याचार केला. आरोपींकडून होणारा अत्याचार असह्य झाल्याने पीडित बालकाने आपल्या पालकांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार करण्याच्या आरोपाखाली बादल, विजू आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपुरात शाळकरी मुलावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:49 IST
चार जणांनी शाळकरी मुलावर सात महिन्यांपासून वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याचे संतापजनक प्रकरण उघडकीस आले असून, यशोधरानगर पोलिसांनी या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरात शाळकरी मुलावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार
ठळक मुद्देयशोधरानगरात गुन्हा : चार आरोपींपैकी दोघे अल्पवयीन