शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

...तोपर्यंत अदानीच्या घोटाळ्यावर प्रश्न विचारत राहू - रंजीत रंजन

By आनंद डेकाटे | Updated: March 31, 2023 16:31 IST

जीपीसी गठीत करा, लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकजूट

नागपूर : अदानीचा घोटाळा गंभीर आहे. अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रूपये कुणी लावले. अदानीची संपत्ती अचानक इतकी कशी वाढली. या प्रश्नांचे उत्तर देशाला मिळायलाच हवे. त्यामुळे केंद्र सरकार जोपर्यंत जेपीसी (जॉईंट पार्लमेंट्री कमिटी) स्थापन करीत नाही, तोपर्यंत अदानीच्या घोटाळ्याबाबत बोलत राहू, सरकारला जाब विचारत राहू, असा इशारा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय महासचिव व प्रवक्त्या रंजीत रंजन यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.

राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली. त्यांचे लोकसभा सदस्यपद रद्द करण्यात आले. त्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षही एकजूट होत आहेत. काँग्रेसतर्फे देशभरात पत्रकार परिषदा घेऊन व लोकांमध्ये जाऊन हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी खा. रंजीत रंजन यांनी नागपुरात पत्रपरिषद घेऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

खा. रंजीत रंजन म्हणाल्या, सत्ताधारी पक्षाचे चुकीचे धोरण आणि घोटाळ्यावर सरकारला जाब विचारणे हे विराेधी पक्षाचे काम असते. विरोधी पक्षाचे नेते म्हणून राहुल गांधी यांनी हे काम अगदी चोखपणे बजावले. यात राहुल गांधी यांचे काय चुकले? असा प्रश्न ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. जेपीसी गठीत झाली तर आपले पितळ उघडे पडेल, याची सरकारला भिती असल्याचेही त्या म्हणाल्या. पत्रपरिषदेला जि.प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, आ. अभिजित वंजारी, माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक, किशोर गजभिये आदी उपस्थित होते.

- राहुल गांधी यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई

विरोधी पक्षाने आमच्या भ्रष्टाचारवर बोलू नये. संसदेत तर चर्चाच नको, आणि चर्चा केलीच तर आम्ही तुमचे सदस्यत्व सुद्धा रद्द करू शकतो, हे संकेत आहेत. केंद्र सरकार राहुल गांधीवर सुडबुद्धीने कारवाई करीत आहे. आज राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाली उद्या इतर पक्षाच्या नेत्यांसोबतच हे होऊ शकते. त्यामुळे लोकशाहीच संकटात आली असून ती वाचवण्यासाठी सर्व देशातील सर्व राजकीय पक्ष एकजूट आहेत, असेही खा. रंजीत रंजन यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकार