शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बसपामध्ये असंतोष, जाळले नेत्यांचे पुतळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:36 IST

महाराष्ट्र विधानसभेतील निवडणुकांनंतर परत एकदा बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश नेतृत्वात बदल झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड.वीरसिंह व नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.संदीप ताजने यांच्या विरोधात नारेबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळेदेखील जाळले.

ठळक मुद्देराष्ट्रीय महासचिव वीरसिंह, संदीप ताजने यांच्याविरोधात संताप : प्रादेशिक पक्ष कार्यालयासमोर आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र विधानसभेतील निवडणुकांनंतर परत एकदा बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश नेतृत्वात बदल झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे. आतापर्यंत केवळ पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते. परंतु मंगळवारी नागपुरातील नारी रोड स्थित प्रादेशिक कार्यालयासमोर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड.वीरसिंह व नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.संदीप ताजने यांच्या विरोधात नारेबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळेदेखील जाळले.वीरसिंह यांच्यासारख्या नेत्यांनी महाराष्ट्रात पक्षाचा सौदा करण्याचे काम केल्याचा संतप्त कार्यकर्त्यांचा आरोप होता. वीरसिंह यांना राज्यातील जे पदाधिकारी मदत करतात त्यांना पक्षात मोठे पद दिले जाते. यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाचा जनाधार कमी होत आहे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात पक्षाचे नुकसान होत आहे असे नेता नको हे आम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांना विरोध प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगायचे आहे. दुसऱ्या नेत्यांना राज्याची जबाबदारी दिली तर ती आनंदाने स्वीकारु व नि:स्वार्थपणे पक्षाचे काम करु, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी दोन्ही नेत्यांविरोधात निदर्शने करण्यात आली.

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीagitationआंदोलन