शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सतीश उके यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

By admin | Updated: February 25, 2017 02:04 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फौजदारी अवमानना प्रकरणात अ‍ॅड. सतीश उके यांच्याविरुद्ध

हायकोर्ट : सोमवारी हजर होण्याचे आदेश नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फौजदारी अवमानना प्रकरणात अ‍ॅड. सतीश उके यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्यांना २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. ते न्यायालयात उपस्थित न राहिल्यास प्रबंधक कार्यालयात जमा असलेली त्यांची सुरक्षा रक्कम जप्त करण्याचे निर्देश देण्यात येईल व प्रकरणावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी आदेशात देण्यात आली आहे. प्रकरणावर २३ फेब्रुवारी रोजी सुनावणी होती. त्यावेळी उके यांना न्यायालयात उपस्थित राहायचे होते. परंतु, त्यांनी व्यक्तीश: उपस्थित न राहता अ‍ॅड. सी. जे. जोवेसन यांना न्यायालयात हजर केले. तसेच, प्रकरणावरील सुनावणी तहकूब करण्यासाठी जोवेसन यांच्या मार्फत अर्ज सादर केला. त्यावरून न्यायालयाने संतप्त होऊन उके यांना फटकारले. १ फेब्रुवारीच्या सुनावणीत उके यांना त्यांची इच्छा असल्यास ८ फेब्रुवारीपर्यंत अन्य वकीलाला नियुक्त करण्यास सांगण्यात आले होते. वकील आत्ताच नियुक्त केल्याच्या कारणावरून सुनावणी तहकूब केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर उके यांनी अन्य वकील नियुक्त न करता ८ व २२ फेब्रुवारी रोजी स्वत:च युक्तिवाद केला. असे असताना सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली जात असल्याचे न्यायालयाने संतप्तपणे सांगून उके यांना २७ फेब्रुवारीपर्यंत वेळ मंजूर केला. उके यांनी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित राहण्यापासून सूट मिळण्यासाठीही अर्ज सादर केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून उके यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केला.(प्रतिनिधी)