शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षेबाबत दिशानिर्देश द्यावे : अभाविपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 19:10 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात धोरण निश्चित न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आतापर्यंत विद्यापीठाने कोणत्याही प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली नाहीत. त्यामुळे यासंदर्भात लवकरात लवकर दिशानिर्देश जारी करावेत, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहोम सेंटरवरच परीक्षा घ्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात धोरण निश्चित न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आतापर्यंत विद्यापीठाने कोणत्याही प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली नाहीत. त्यामुळे यासंदर्भात लवकरात लवकर दिशानिर्देश जारी करावेत, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षा महाविद्यालयांच्या होम सेंटरवरच घेता येईल व संचालन विद्यापीठाने करावे, असे अभाविपतर्फे मांडण्यात आले आहे.बऱ्याच महाविद्यालयाचे अभ्यासक्रम पूर्ण झालेले नाही, परीक्षेची गुणवत्ता लक्षात घेता तसेच विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होऊ नये याकरिता विद्यापीठाने कमीत कमी समान अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घ्यावी. अभ्यासक्रमावर आधारित परिपत्रक विद्यापीठाद्वारे काढण्यात यावे. त्याचप्रमाणे विद्यापीठात शिक्षण घेणाºया इतर राज्यातील विद्यार्थ्यांकरिता त्यांच्या घरीच परीक्षा केंद्र द्यावे. उत्तरपत्रिका पीडीएफ द्वारा अथवा इतर सोशल मीडिया द्वारा पाठवण्याची मुभा द्यावी, अशी सूचना अभाविपतर्फे करण्यात आली आहे.तालुकास्तरावर परीक्षा घ्याविद्यापीठ क्षेत्रातील तालुका स्तरावर परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्यात यावी. विद्यार्थी ज्या गावी अडकला असेल त्याला तेथेच परीक्षा देण्याची व्यवस्था विद्यापीठातर्फे करण्यात यावी. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे असे परिपत्रक विद्यापीठाने जारी करावे. तसेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मागील सत्रात राहिलेल्या विषयांमुळे त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी विद्यापीठाने आपली भूमिका स्पष्ट करावी व विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी अभाविपचे महानगरमंत्री अमित पटले यांनी केली आहे. 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा