शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रातुम नागपूर विद्यापीठ! सेवानिवृत्तांचा सत्कार यापुढे दीक्षांत सभागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 11:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची भावना लक्षात घेता यापुढे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विद्यापीठाच्यावतीने दीक्षांत सभागृहात विशेष सन्मान करण्यात येईल, असा मानस कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देकुलगुरू नरमलेआता प्रत्येक कर्मचाऱ्याचा निवृत्तीच्या वेळी होणार सन्मानकर्मचाऱ्यांच्या संतापानंतर प्रशासनाचे सावध पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ‘पार्किंग’च्या जागेत घ्यावा लागल्याच्या मुद्यावरुन कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर विविध प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांची भावना लक्षात घेता यापुढे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विद्यापीठाच्यावतीने दीक्षांत सभागृहात विशेष सन्मान करण्यात येईल, असा मानस कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केला. यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले.नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागातील अधीक्षक प्रकाश मांडवकर मंगळवारी निवृत्त झाले. विद्यापीठाला सुमारे ३० वर्षे सेवा दिल्यामुळे कर्मचारी संघटनेने त्यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम दीक्षांत सभागृहात घेऊ द्यावा, अशी परवानगी मागितली होती. मात्र विद्यापीठ कर्मचारी संघटना ही खासगी असल्याचे कारण देत विद्यापीठाने परवानगी नाकारली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशदाराच्या बाहेर असलेल्या ‘पार्किंग’च्या जागेजवळ हा कार्यक्रम घेतला. बुधवारी विद्यापीठ वर्तुळात यावरुन संतप्त प्रतिक्रिया आल्या. अधिकाऱ्यांचे निरोप समारंभ दीक्षांत सभागृहात आयोजित केले जातात. मग आपले आयुष्य विद्यापीठासाठी वेचणाऱ्या व समर्पित भावनेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमवेत दुजाभाव का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा केली असता विद्यापीठ कर्मचारी संघटना ही खासगी असल्यामुळे त्यांना दीक्षांत सभागृह देता आले नाही. मात्र विद्यापीठात इतरही सभागृह होते. तेथे सहजपणे कार्यक्रम करता आला असता असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे विद्यापीठात कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी सेवानिवृत्त होणार असेल तर त्याचा कार्यक्रम विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येईल.

अमरावतीत ‘कर्तव्यपूर्ती’, नागपुरात दुजाभाव का ?एकीकडे विद्यापीठाने कर्मचाऱ्यांना दीक्षांत सभागृह नाकारले असताना दुसरीकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते तेथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सन्मान करण्यात आला. विद्यापीठाने याला कर्तव्यपूर्ती सोहळा असे नाव दिले. वाहनचालक व परीक्षा सहायक यांचा कुलगुरूंचा हस्ते सत्कार झाला. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी निमंत्रण देऊनदेखील येण्याची तसदी दाखविली नाही, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ