शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नागपूर विद्यापीठ; कुलसचिव नियुक्तीच्या प्रक्रियेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:03 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पूर्णकालीन कुलसचिवांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देसात महिन्यांपासून पूर्णवेळ अधिकारी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पूर्णकालीन कुलसचिवांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मागील सात महिन्यांपासून या पदावर पूर्णवेळ अधिकारी नसून प्रभारी पदावरुनदेखील बराच वाद निर्माण झाला होता. मात्र आता पूर्णवेळ पदच भरण्यात येणार असून लवकरच त्यासंदर्भात जाहिरात जारी करण्यात आली आहे. २५ मार्चपर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करता येणार असून न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या आधारावर नियुक्ती अवलंबून असेल, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.कुलसचिव पदावरून डॉ. पुरण मेश्राम यांना ३० जून रोजी निवृत्त करण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारकडून आल्यानंतर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी डॉ. मेश्राम यांना निवृत्तीचा आदेश दिला होता.डॉ. मेश्राम यांनी कुलसचिव पदावर आणखी दोन वर्षे कायम ठेवण्याची मागणी केली होती. डॉ. पुरण मेश्राम यांना सहायक कुलसचिव ते कुलसचिव या पदावर नियुक्ती होत असताना त्यांना शिक्षक प्रवर्गाची वेतनश्रेणी देण्यात आली होती. त्यामुळे कुलसचिव पदावर प्रोफेसर ग्रेड असल्याचा दावा करीत त्यांनी वेतनश्रेणी व सेवानिवृत्तीचा कालावधी ६० वर्षे देण्यात यावा, अशी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर दाखल केली आहे. सदर याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने डॉ. मेश्राम यांना कोणताही अंतरिम दिलासा दिला नाही, तर याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. त्यामुळे न्यायालयीन आदेश नसल्याने डॉ. मेश्राम यांना सेवानिवृत्त करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता.दरम्यान, आॅगस्ट २०१८ पासून विद्यापीठातील कुलसचिव पद रिक्त आहे. त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यासंदर्भात उपकुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी आक्षेपदेखील घेतला होता व राज्य अनुसूचित जाती आयोगात तक्रारदेखील केली होती. आयोगाच्या शिफारशीनंतरदेखील डॉ.हिरेखण यांना प्रभार देण्यात आला नाही.दरम्यान, नियमित कुलसचिव नियुक्त करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. काणे यांनी घेतला व त्यानुसार जाहिरात काढण्यात आली. ही हायकोर्टात डॉ. मेश्राम यांच्या प्रलंबित असलेल्या याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ