शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ; जागा रिक्त, तरीही ‘डोनेशन’ची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 11:13 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कमी टक्केवारी मिळाल्यामुळे अनेक पालक चिंतेत असून, प्रवेशासाठी महाविद्यालयांत चकरा मारत आहेत. मात्र स्थितीचा फायदा घेत प्रवेशासाठी ‘डोनेशन’ची मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनामांकित महाविद्यालयांकडून होतोय प्रकार व्यवस्थापन कोट्याच्या नावाखाली पालकांची पिळवणूक

आशीष दुबे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कमी टक्केवारी मिळाल्यामुळे अनेक पालक चिंतेत असून, प्रवेशासाठी महाविद्यालयांत चकरा मारत आहेत. अनेक महाविद्यालयांत जागा रिक्त आहेत. मात्र स्थितीचा फायदा घेत प्रवेशासाठी ‘डोनेशन’ची मागणी करण्यात येत आहे. व्यवस्थापन कोट्याच्या नावाखाली हा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक महाविद्यालये अनुदानित आहेत.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, नामवंत महाविद्यालयांकडून ‘डोनेशन’ मागण्यात येत आहे. अभियांत्रिकीच्या एका एका जागेसाठी ४ ते ५ लाख रुपये, बीफार्मसाठी ३ ते ४ लाख रुपयांची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क वेगळ्याने भरण्यास सांगितले जात आहे. बीएस्सी, बीकॉममध्ये प्रवेशासाठीदेखील ‘डोनेशन’ची मागणी करण्यात येत आहे. ग्रामीण क्षेत्रांत बीएस्सीमध्ये (कॉम्प्युटर सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, आयटी, मायक्रोबायोलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून ३० ते ५० हजार तर शहरी भागात ५० ते ७५ हजार रुपयांची ‘डोनेशन’ मागण्यात येत आहे. बीकॉममध्ये इंग्रजी अभ्यासक्रमाला सर्वाधिक मागणी आहे. या अभ्यासक्रमाच्या अनुदानित जागेवर प्रवेशासाठी अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत ‘डोनेशन’ मागण्यात येत आहे. ‘डोनेशन’ न देऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी गुणांचे कारण देऊन विना अनुदानित अभ्यासक्रमातील ‘बीसीसीए’मध्ये प्रवेश घेण्यास सांगितले जात आहे. ‘बीकॉम’ अनुदानित अभ्यासक्रमाचे शुल्क ५०० ते १५०० रुपये आहे, तर ‘बीसीसीए’चे शुल्क १५ हजार ते ३५ हजार आहे.अनेक महाविद्यालयांत जागा रिक्त राहण्याचा धोका आहे. मात्र विद्यार्थ्यांना वास्तव सांगण्याचे टाळण्यात येत आहे.

विद्यापीठाचे मौनमहाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भात विद्यापीठाने मौन धारण केले आहे. विद्यापीठाने केवळ प्रवेशाचे वेळापत्रक जारी केले. कुठल्याही महाविद्यालयाने ‘डोनेशन’ घेऊ नये, असा इशारा देण्यात आलेला नाही. महाविद्यालयात कशाप्रकारे प्रवेश होत आहेत, यावर विद्यापीठाकडून कुठल्याही प्रकारे लक्ष देण्यात येत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ