शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ; आता ‘प्रॉस्पेक्टस’मधून कमाई करता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 14:21 IST

प्रवेशप्रक्रियेच्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांकडून ‘प्रॉस्पेक्टस’च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेण्यात येते. मात्र महाविद्यालयांच्या या प्रकारांवर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अंकुश लावण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे‘यूजीसी’ आणणार नियंत्रणसंकेतस्थळावर परिपूर्ण माहिती टाकणे होणार अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवेशप्रक्रियेच्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांकडून ‘प्रॉस्पेक्टस’च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेण्यात येते. मात्र महाविद्यालयांच्या या प्रकारांवर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अंकुश लावण्यात येणार आहे. महाविद्यालयांना ‘प्रॉस्पेक्टस’मधून कमाई करता येणार नाही व परवडणाऱ्या दरातच त्याची विक्री झाली पाहिजे, अशी शिफारस आयोगाकडून करण्यात येणार आहे. तक्रार निवारणासंदर्भातील नियमावलीत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सुधारणा करण्यात येत आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने सुधारित नियमावलींचा प्रस्ताव तयार केला आहे. यात यासंदर्भात स्पष्ट उल्लेख करण्यात आले आहेत.अनेक महाविद्यालयांकडून तेथील सुविधा, शिक्षक, शुल्क इत्यादींची माहिती ‘प्रॉस्पेक्टस’मध्ये देण्याचे टाळण्यात येते. शिवाय संकेतस्थळावरदेखील योग्य माहिती नसते. असा स्थितीत विद्यार्थ्यांची अनेकदा दिशाभूल होते. एकदा प्रवेश झाल्यावर मग तक्रार करूनदेखील भरपाई होणे कठीण असते.विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१२ साली तक्रार निवारण नियमावली जारी केली होती. मात्र या नियमावलीचे योग्य पालन होत नसून ठोस कारवाईची तरतूद नसल्याने विद्यापीठ व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे गंभीरतेने पाहिल्या जात नसल्याच्या तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या. यानंतर आयोगातर्फे तक्रार निवारण नियमावलीत सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली. या समितीने नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. प्रत्येक महाविद्यालयाला संकेतस्थळावर ‘प्रॉस्पेक्टस’ टाकणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ