शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ; महाविद्यालय शहरात, वसतिगृह जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 11:16 IST

ग्रामीण भागातून मोठी आस घेऊन शिक्षणासाठी शहरात आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा बस नाही, करावी लागते पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागातून मोठी आस घेऊन शिक्षणासाठी शहरात आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे. शहरातील महाविद्यालय असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना शहरापासून दूर अंतरावरील वसतिगृहात स्थानांतरित केल्याने त्यांना अनेक गैरसोर्इंचा सामना करावा लागत आहे. पायपीट करून बसस्टॅँडवर पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नाही. शिक्षणाचा अक्षरश: खेळखंडोबा होत असल्याची कैफियत विद्यार्थ्यांनी मांडली.सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांची महाविद्यालये ही शहराच्या भागात आहेत. त्यामुळे शहरातच वसतिगृहाची व्यवस्था झाल्यास त्यांना सोयीचे होते. हे विद्यार्थी स्वत:च्या सायकलनेही कॉलेजमध्ये पोहचू शकतात. मात्र यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना यावर्षी शहराबाहेरील वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली. अशाच वर्धा रोडवरील रुई पांजरी ग्रामपंचायतमध्ये असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. हे वसतिगृह शहरापासून २२ किलोमीटर दूर अंतरावर आहे. आधी हे वसतिगृह मेन रोडवर असल्याचे सांगत वेळेवर बस मिळत असल्याचे सांगण्यात आले. मात्र मुख्य रस्त्यापासून दूर जंगलात असलेल्या गावामध्ये हे वसतिगृह आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बस पकडण्यासाठी बरेच दूर पायी चालावे लागते. त्यानंतरही वेळेवर त्यांना बस मिळत नाही. बहुतेक विद्यार्थी धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, डॉ. आंबेडकर कॉलेज, के.डी.के. कॉलेज आदी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. यातील बहुतेकांचे कॉलेज हे सकाळी ७ वाजतापासून सुरू होतात. मात्र रिठीवरून पहिली बसच ७.३० वाजता सुटते. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहचेपर्यंत ९.३० वाजतात व तोपर्यंत अनेक वर्ग संपलेले असतात.कॉलेज ११.३० वाजता सुटल्यानंतर मुलांना ४ वाजताच्या बसची वाट पहावी लागते. विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेवर नाश्ता मिळत नाही व हे विद्यार्थी महाविद्यालयाची वेळ पाळण्यासाठी नाश्ता सोडून उपाशीच निघतात. त्यामुळे त्यांना दिवसभर उपाशी राहावे लागते. वर्धा रोडवर असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या वसतिगृहाची सुविधा होते, मात्र शहरातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक त्रास आणि शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना शहरातीलच वसतिगृहात स्थानांतरित करण्यात यावे आणि शक्य असेल तर महाविद्यालयाच्या वेळेनुसार बसची सुविधा करून देण्यात यावी, या मागणीचे निवेदन झरीच्या वसतिगृहात राहणाऱ्या ७० च्यावर विद्यार्थ्यांनी विभागाकडे केली आहे.

म्हणून केले विद्यार्थ्यांना स्थानांतरितयाबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दीक्षाभूमीजवळील संत चोखामेळा वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येणार असल्याने या विद्यार्थ्यांना झरी पांजरीच्या वसतिगृहात स्थानांतरित केल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे चोखामेळाचे दोन वसतिगृह आहेत. त्यापैकी जुन्या म्हणजे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना स्थानिक वसतिगृहात जागा देण्यात आली व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आले. झरी पांजरीचे वसतिगृह जंगलात आहे. येथे वैद्यकीय सुविधा नाहीत व विद्यार्थ्यांना जंगली श्वापदांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शहरातील मानेवाडा किंवा मनीषनगरच्या वसतिगृहात व्यवस्था करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ