शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठाचीदेखील परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:21 IST

University exams राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६९ हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यापीठात प्रथमच ‘वेबबेस्ड’ परीक्षा होणार आहे.

ठळक मुद्दे‘वेबबेस्ड’ परीक्षा : पहिल्या टप्प्यात ६९ हजार विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६९ हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यापीठात प्रथमच ‘वेबबेस्ड’ परीक्षा होणार आहे. उन्हाळी परीक्षा ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून झाल्या होत्या. सुरुवातीला त्यात काही प्रमाणात गोंधळ झाला होता. मात्र त्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडल्या होत्या. संकेतस्थळाच्या माध्यमातून परीक्षा घेण्याचा पहिलाच प्रयोग असल्याने विद्यापीठासाठीदेखील ही परीक्षाच मानली जात आहे.

‘कोरोना’मुळे ‘ऑनलाईन’ परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार विद्यापीठाने ‘अ‍ॅप’ऐवजी ‘वेबबेस्ड’ परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात बीकॉम, बीएस्सी, बीई, बीबीए इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना घरबसल्या संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब्लेटच्या माध्यमातून परीक्षा देता येणार आहे. त्यासंदर्भात विद्यापीठाने संकेतस्थळावर विस्तृत दिशानिर्देश जारी केले आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचे पालन करावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना एका तासात ४० बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील. इंटरनेट कनेक्टीव्हिटी व इतर अडचणी लक्षात घेता, प्रत्येक सत्राला तीन तासाचा वेळ देण्यात आला आहे. त्यादरम्यान विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील.

‘मॉक टेस्ट’साठी विचारणा

मंगळवारी ‘मॉक टेस्ट’बाबत विचारणा होत होती. बुधवारी सकाळी परीक्षेबाबतच्या तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली. ‘मॉक टेस्ट’देखील सुरू झाली. अनेक विद्यार्थ्यांकडून याबाबत विद्यापीठाला विचारणा होत होती. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी माहिती देणारा एक व्हिडीओदेखील तयार करण्यात आला असून, तो त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवा

- फ्रंट कॅमेरा किंवा वेबकॅम सुरू असणे अनिवार्य.

- लॅपटॉप, मोबाईल चार्ज पूर्णपणे चार्ज असावे.

- इंटरनेट कनेक्टीव्हिटी अगोदर तपासून घ्यावी.

- परीक्षेसाठी बसण्याच्या जागी योग्य प्रकाश हवा.

- वेबकॅम किंवा फ्रंट कॅमेरा चेहऱ्यावर फोकस असावा.

- एमएस टीम्स, झूम, गुगल मीट यासारखे अ‍ॅप्स अगोदर डिलीट करावे.

- परीक्षेदरम्यान कॅलक्युलेटर, लाँग टेबल आणि कोरे कागद वापरता येतील.

कारवाई होऊ नये यासाठी सूचना

- मोबाईल कॅलक्युलेटर वापरू नये.

- परीक्षेदरम्यान कुठलेही बोलणे व हालचाल टाळावी.

- चेहऱ्याला मास्क, केस, हात यांनी झाकू नये.

- मुख्य स्क्रीनपासून दूर जाता येणार नाही.

- एकापेक्षा अधिक उपकरणांवरून लॉगिन करता येणार नाही.

- वेबकॅम, मायक्रोफोन्स किंवा स्क्रीनशेअरचे पर्याय असलेले अ‍ॅप्लिकेशन्सना मनाई.

- हेडफोन, ईअरबड्सचा उपयोग करू नये.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा